---Advertisement---

अश्विनकडून पाकिस्तानच्या बॉलिंग अटॅकचं कौतुक, स्पिनर्सची खाण असलेल्या ‘या’ संघाकडून उलटफेरची अपेक्षा

R-Ashwin
---Advertisement---

भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी जणू पर्वणीच असते. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान संघातील सामन्यासाठी स्टेडिअममध्ये तुडुंब गर्दी होत असते. अशीच गर्दी पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. उभय संघात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. अशातच भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. त्याच्या मते, भारत आणि पाकिस्तान या तुल्यबळ संघात मोठा सामना होईल.

पाकिस्तानचा गोलंदाजी अटॅक शानदार
आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना आर अश्विन (R Ashwin) याने मोठे भाष्य केले. त्याने म्हटले की, भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात पाकिस्तान संघाच्या शानदार गोलंदाजी अटॅकमुळे दोन्हीकडे संतुलन असेल. तो म्हणाला की, “भारत विरुद्ध पाकिस्तान संघात मागील काही सामने असाधारण राहिले आहेत. मला वाटते की, आपण आणखी एक ब्लॉकबस्टर भारत-पाकिस्तान सामन्याची अपेक्षा करू शकतो. हा संतुलित सामना होईल. कारण, पाकिस्तान संघाकडेही चांगला वेगवान गोलंदाजी अटॅक आहे.”

पाकिस्तानविरुद्ध शानदार आकडेवारी
खरं तर, भारताने वनडे विश्वचषक इतिहासात पाकिस्तानविरुद्ध शानदार विक्रम बनवला आहे. पाकिस्तान भारताला एकदाही पराभूत करू शकला नाहीये. मात्र, अश्विनच्या वक्तव्यावरून समजते की, आगामी सामन्यांचा निकाल ठरवण्यासाठी मागील सामन्यांचे निकाल गरजेचे नाहीत. त्याऐवजी त्याला एक रोमांचक आणि नजीकच्या सामन्याची आशा आहे.

अफगाणिस्तान संघ करू शकतो उलटफेर
अश्विनने अफगाणिस्तान संघाविषयी म्हटले की, ते अनेक संघांसाठी मोठे आव्हान ठरू शकतात. तो म्हणाला, “त्यांचे गोलंदाजी आक्रमण काही मोठ्या दिग्गजांना चिंतेत टाकू शकतात. मला वाटते की, अफगाणिस्तान यावर्षी काही संघांना आव्हान देऊ शकते. मागील वेळी 2011 विश्वचषकादरम्यान भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान संघाने उपांत्य सामन्यासाठी क्वालिफाय केले होते. नक्कीच बांगलादेश खूप चांगला संघ आहे, पण मला वाटते की, अफगाणिस्तान यावर्षी काही उलटफेर करेल.” तो पुढे असेही म्हणाला की, “मागील विश्वचषकादरम्यानही त्यांनी खरंच चांगली कामगिरी केली होती. मात्र, या परिस्थितीत आपल्याला सर्वजण राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि झाकिर खान यांच्या फिरकीची ताकद माहितीये.”

खरं तर, भारतीय संघ 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये अफगाणिस्तानशी दोन हात करेल. हा भारताचा दुसरा सामना असेल. त्यापूर्वी भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जाईल. (spinner ravichandran ashwin praise on pakistan bowling attack read more)

महत्वाच्या बातम्या-
MPL 2023 गाजवलेले टॉप फाईव्ह धुरंधर! क्रिकेटजगताला घ्यायला लावली आपली दखल
रत्नागिरी जेट्सचे पाच पांडव! सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाला बनवले चॅम्पियन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---