---Advertisement---

रत्नागिरी जेट्सचे पाच पांडव! सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाला बनवले चॅम्पियन

On: शुक्रवार, जून 30, 2023 5:59 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स संघात पार पडला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे अखेर गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिलेल्या रत्नागिरी संघाला विजयी घोषित करण्यात आले. या स्पर्धेत रत्नागिरी संघाने सातत्यपूर्ण खेळ दाखवला. संघाला विजेते बनवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्य रत्नागिरी संघातील त्याच प्रमुख पाच खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकू. 

अझीम काझी-  रत्नागिरी संघाचा कर्णधार अझीम काझी याने स्वतः आघाडीवर राहत संघाचे अत्यंत शानदार पद्धतीने नेतृत्व केले. संघ अडचणीत असताना त्याने फलंदाजीत जबाबदारी घेत अनेक वेळा छोटेखानी मात्र महत्त्वपूर्ण खेळ्या केल्या. त्याच्या नावे 120 पेक्षा जास्त धावा आणि 6 बळी जमा आहेत

प्रदीप धाडे-  महाराष्ट्र संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या प्रदीप याने संपूर्ण स्पर्धेत रत्नागिरी संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व केले. त्याने स्पर्धेत सहा सामने खेळताना 11 बळी आपल्या नावे केले. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

विजय पावले- प्रदीप प्रमाणेच विजय पावले हा देखील रत्नागिरीसाठी सकारात्मक बाजू म्हणून समोर आला. टेनिस क्रिकेटमधील मान्यवर खेळाडू असलेल्या विजयने पहिल्या सामन्यापासून विरोधी संघांसमोर आव्हान निर्माण केले. त्याने स्पर्धेत दहा बळी मिळवत सर्वाधिक बळी घेत गोलंदाजांच्या यादीत चौथे स्थान पटकावले.

धीरज फटांगरे- रत्नागिरी संघात अनेक मोठे फटकेबाज असताना धीरज फटांगरे याने पहिल्या दोन सामन्यातील अपयश विसरून, सलामीला फलंदाजीला येताना सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली. दोन अर्धशतकांसह त्याने सहा सामन्यात 153 धावा केल्या. तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला.

कुणाल थोरात- डाव्या हाताचा फिरकीपटू कुणाल थोरात हा संघासाठी हुकमी एक्का ठरला. त्याने अगदी पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत संघाच्या  विजयात योगदान दिले. सात पेक्षा कमी धावांच्या इकॉनॉमीने त्याने आठ बळी मिळवले.

याव्यतिरिक्त दिव्यांग हिंगणेकर, निखिल नाईक, किरण चोरमले, निकीत धुमाळ व प्रीतम पाटील यांनी देखील संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

(MPL 2023 Ratnagiri Jets Five Key Players Azim Kazi Vijay Pawale Pradeep Dhade)

महत्वाच्या बातम्या-
पुण्याने गमावली एमपीएल ट्रॉफी, पण सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत पुणेकरांचीच आघाडी
BREAKING: रत्नागिरी जेट्सने उंचावली MPL 2023 ची ट्रॉफी! कोल्हापूर टस्कर्सच्या पदरी निराशा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---