क्रिकेटच्या मैदानात नेहमीच खेळाडू दुखापतग्रस्त होत असतात. लाईव्ह सामन्यात देखील यापूर्वी अनेकदा खेळाडूंना दुखापती झाल्याचा आपण पाहिले आहे. सध्या सुरू असलेल्या लंका प्रीमियर लीग 2022 मध्येही एका यष्टीरक्षक फलंदाजाला अशीच लाईव्ह सामन्यात दुखापत झाली आहे. ग्लॅडिएटर्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आझम खान याला यष्टीपाठी उभा असताना डोक्यात चेंडू लागला, ज्यामुळे मैदान देखील सोडावे लागले.
लंका प्रीमियर लीग 2022 मधील 9 वा सामना गाले ग्लॅडिएटर्स आणि कँडी फाल्कंस या संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यादरम्यान ग्लॅडिएटर्सचा यष्टीरक्षक आझम खान (Azam Khan) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रसंगाचा व्हिडोओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आझम खान लंका प्रीमियर लीगमध्ये ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळत आहे. कँडी फाल्कंसच्या डावातील 16 व्या षटकात त्याला ही दुखापत झाली.
या षटकात नुवान प्रदीप गोलंदाजी करत होता. षटकातील पहिल्या चेंडूवर चमीका करुणारत्नेने चार धावा घेतल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर प्रदीपने लेग स्टंपच्या खूप बाहेर टाकला. चेंडू वाइड असल्यामुळे फलंदाजाने बॅठ मध्ये घातली नाही आणि यष्टीरक्षकाकडे सोडला. चेंडूने यष्टीपाठी एक टप्पा घेतला आणि थेट यष्टीरक्षकाच्या डोक्यात जाऊन लागला. यावेळी आझमने डोक्यात हेलमेट देखील घातले नव्हते, परिणामी या चेंडूमुळे त्याला गंभीर दुखापत झाली. चेंडू लागल्यानंतर त्याला मेडिकल टीम आणि कर्णचारी यांनी स्ट्रेचरच्या सहायाने मैदानाबाहेर नेले.
आझम खान पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक फलंदाज मोईन खान (Moin Khan) याचा मुलगा आहे. लंका प्रीमियर लीगमध्ये मोईन खान ग्लॅडिएटर्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. असात स्वतःच्या मुलाला अशा प्रकारे दुखापत झाल्याचे पाहून त्यांना देखील धक्का बसला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र फिरताना दिसत आहे.
Very awkward bounce for Azam Khan. Hit on the head and taken off in a stretcher. Hope he is alright @MAzamKhan45 #AzamKhan #PAKvENG pic.twitter.com/fgFgof88TZ
— Jahangir Babar (@realsirjee) December 12, 2022
ग्लॅडिएटर्सचा लीगमधील दुसरा विजय –
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर ग्लॅडिएटर्सने प्रथम फलंदाजी केली. थानुका दबारे (70) आणि नुवानिन्दु फर्नांडो (56) यांच्या अर्धशतकीय योगदानाच्या जोरावर ग्लॅडिएटर्सने मर्यादित 20 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावत 153 धावा केल्या. प्रत्युत्तरात कँडी फाल्कंस संघ 20 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 141 धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणामी कुलस मेंडिस याच्या नेतृत्वातील ग्लॅडिएटर्स संघ 12 धावांनी विजयी झाला. (A Pakistani player was injured while wicket keeping, taken off the field on a stretcher after being hit by a ball on the head)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चट्टोग्राममध्ये पूर्ण पाच दिवसांचा खेळ होईल का? खेळपट्टी, हवामानासह सर्व काही
संजूच्या आयर्लंडसाठी खेळण्याच्या प्रस्तावावर मोठी माहिती उघड; क्रिकेट बोर्ड म्हणतेय…