---Advertisement---

रोहितसारखा दिसणारा व्यक्ती पाकिस्तानात पितोय सरबत; फोटोने वेधले सोशल मीडियाचे लक्ष

---Advertisement---

भारतीय संघाचा उपकर्णधार आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार सध्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी यूएईमध्ये आहे. मात्र, अशाताच तो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यामागचे कारण म्हणजे, रोहितसारखाच दिसणारा पाकिस्तानमधील एक व्यक्ती. या व्यक्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते त्याच्या या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

रोहितसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीच्या फोटोवर चाहते मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, हा कमी बजटचा हिटमॅन आहे. तर दुसऱ्या एका वापरकत्याने लिहिले आहे की, मुंबई इंडियन्स हरत आहे, म्हणून प्रेशर हँडल करण्यासाठी रोहितला सरबताची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड संघाने पाकिस्तान सोबतची मालिका रद्द केली होती. सामना सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी त्यांनी हा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या या निर्णयानंतर पाकिस्तानची विश्वक्रिकेटमध्ये चांगलीच नाचक्की झाली होती आणि चाहते निराश झाले होते. अशात आता रोहितसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीमुळे चाहत्यांचे मनोरंजन होत आहे. हा फोटो पाकिस्तानच्या रावलपिंडीच्या एका रस्त्यावरचा असून हा व्यक्ती तेथे सरबत पिताना दिसत आहे.

एका पाकिस्तानी सोशल मीडिया वापरकर्त्याने खूपच गमतीशीर पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात लिहिले आहे की, ‘कोण म्हणतं पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसाठी सुरक्षित नाही. हे पाहा भारतीय स्टार क्रिकेटर रोहित शर्मा रावलपिंडीमध्ये सरबताचा आनंद घेत आहे.’

https://twitter.com/Vaani123456/status/1442508521728208897

https://twitter.com/PrashShukla1/status/1442754076593192967

दरम्यान, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात रोहितच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने खूपच खराब प्रदर्शन केले आहे. मुंबईने दुसऱ्या टप्प्यातील त्यांचे पहिले तिन्ही सामने गमावले आहेत. २०१८ नंतर पहिलीच वेळ आहे जेव्हा मुंबईने सलग तीन सामने गमावले आहेत. संघाला अजून चार सामने खेळायचे आहेत आणि हे चारही सामने जिंकले तर संघाची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता आहे.

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---