शेन वॉर्न या खेळाडूला जगातील सर्वात महान फिरकीपटूंपैकी एक मानले जाते. वॉर्न कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा दुसरा फलंदाज आहे. वॉर्न सारखा दुसरा खेळाडू अजूनपर्यंत दुसरा कोणता नाही असे म्हटले जायचे. पण आता भारताचे माजी गोलंदाज आणि भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी भविष्यवाणी करत त्या गोलंदाजाचा उल्लेख केला आहे जो जगातील दुसरा शेन वॉर्न ठरू शकतो.
भरत अरुणने कुलदीप यादवच्या कामगिरीची तुलना शेन वॉर्नशी केली आहे. त्यांनी कुलदीप यादव बद्दल बोलताना म्हटले की, तो इंग्लंडमध्ये चांगल प्रदर्शन करू शकतो. भरत अरुणने शेन वॉर्नच्या इंग्लंडमधील यशस्वी कामगिरीबद्दल भाष्य केले आणि सल्ला दिला की कुलदीप यादव सुद्धा या प्रकारे यशस्वी कामगिरी करण्यात यश मिळवू शकतो.
अरुण यांनी रेवस्पोर्ट्सशी बोलताना म्हटले, असे फिरकीपटू नेहमीच चांगल्या पद्धतीने काम करतात खास करून इंग्लंडमध्ये. वेगवान गोलंदाज अशा परिस्थितीत एक वेगळी भूमिका निभावतात. भरत अरुण यांच्या बद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी भारतासाठी 2 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. भरत यांचं आंतरराष्ट्रीय करिअर खूप थोडं राहील आहे.
कुलदीपकडे इंग्लंडमध्ये सफल होण्यासाठी लागणारे कौशल्ये आहेत. असेही ते म्हणाले.





