टोकियो ऑलिंपिक्स २०२० मधील शनिवारचा दिवस (७ ऑगस्ट) भारतासाठी आनंद घेऊन आला आहे. भालाफेक या खेळात भारताच्या नीरज चोप्राने अव्वल क्रमांक पटकावत ऑलिंपिकचे सुवर्ण पदक जिंकला आहे. विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच त्याच्याकडून पदकाची आशा केली जात होती आणि तो भारतीय चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला. आता त्याच्या या विजयाने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. विशेष म्हणजे या पदकासह तो ऑलिंपिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
या भारतीय खेळाडूने पहिल्यांदा पटकावले होते ऑलिंपिकमध्ये पहिले सुवर्ण पदक
बीजिंग ऑलिंपिक्स २००८ स्पर्धेत १० मीटर एअर रायफल या खेळात अभिनव बिंद्राने दमदार कामगिरी केली होती. यासह त्याने अव्वल क्रमांक पटकावत पहिले ऑलिंपिक सुवर्ण पदक जिंकले होते. (A proud moment for the nation as Neeraj Chopra wins India’s first gold medal At Olympics 2020)
Indian eyes are gleaming with gold! 🤩🇮🇳
For the first time in the country's history, they have an Olympic gold medallist in #athletics. 🥇
Congratulations, Neeraj Chopra. The #Tokyo2020 men's javelin Olympic Champion. 👏#Athlete365 #StrongerTogether #Javelin pic.twitter.com/AkMQtDNTSq
— Athlete365 (@Athlete365) August 7, 2021
अशी केली ती ऐतिहासिक कामगिरी
पात्रता फेरीत ८६.६५ मीटर भालाफेक करून नीरज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. अंतिम फेरीत तो दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करत होता. त्याने आपल्या पहिल्या संधीमध्ये ८७.०३ मीटर भालाफेक करत आघाडी घेतली. दुसऱ्या संधीमध्ये त्याने आणखी सुधारणा करत ८७.५८ मीटर भाला फेकला. पहिल्या फेरीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या संधीमध्ये तो ७६.७९ मीटरची फेक करू शकला.
अंतिम आठमध्ये देखील तो अव्वल भालाफेकपटू म्हणून सहभागी झाला. तो अखेरच्या तीन संधीमध्ये त्याची पहिली फेक चुकीची ठरवण्यात आली. मनासारखी फेक न झाल्याने अंतिम फेरीतील दुसऱ्या संधीत त्याने फॉल थ्रो केला. सहाव्या आणि अखेरच्या संधीमध्ये ८४.०२ मीटरचा भाला त्याने फेकला. मात्र, त्याची दुसरी ८७.५८ मीटरची फेक त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यास पुरेशी होती.
नीरजविषयी थोडंसं
भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५vमेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-इतिहास घडला! भारताच्या नीरज चोप्राने मिळवले भालाफेकीत सुवर्णपदक
-भारतीय गोल्फर अदिती अशोकला ऑलिम्पिकमधील पदकाने हुलकावणी दिली, पण देशासाठी ती इतिहास ठरली