सौरव गांगुली याची गणनाभाारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. या माजी डावखुऱ्या फलंदाजाने 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि कारकिर्दीत 311 वनडे आणि 113 कसोटी सामने खेळले. या काळात, एकदिवसीय फॉर्मेटमध्ये, गांगुलीने 22 शतके आणि 72 अर्धशतकांच्या मदतीने 11,363 धावा केल्या. त्याच वेळी, त्याने कसोटीत एक द्विशतक, 16 शतके आणि 35 अर्धशतकांच्या मदतीने 7,212 धावा केल्या.आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या गांगुलीने 2003 च्या एकदिवसीय विश्वचषकात संघाचे नेतृत्व केले आणि त्याला अंतिम फेरीत नेले. मात्र, मेन इन ब्लू संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.
सौरव गांगुली (Sourav Ganguly) अलीकडेच एका रिअऍलिटी शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाला होता. जिथे त्याला विचारण्यात आले की, सचिन तेंडुलकर,(Sachin Tendulkar) विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनीमधील (Ms Dhoni) तुम्हाला कोणते गुण जास्त आवडतात? काही वेळ विचार करून दादा म्हणाला, सचिनचा मोठेपणा, विराटची आक्रमकता आणि धोनीची शांत राहण्याची कला.
यादरम्यान माजी भारतीय कर्णधाराला असेही विचारण्यात आले की, तुमच्याकडे कोणते गुण आहेत जे सचिन, विराट आणि धोनीमध्ये नाहीत? याला उत्तर देताना गांगुली हसत हसत म्हणाला, ‘ऍडजस्टमेंट.’ त्याचं उत्तर ऐकून शोचा होस्टही हसताना दिसला आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.
यापूर्वी, गांगुलीने विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांचे जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश करण्याचे समर्थन केले होते. दादा म्हणाला होता, ‘नक्कीच रोहितने टी-20 विश्वचषकामध्ये संघाचे नेतृत्व करावे. त्यात विराट कोहलीही असावा. गेल्या 14 महिन्यांपासून तो टी20 संघाचा भाग नसला तरीही तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. (A quality that is not even in Virat Sachin and Dhoni? Dada gave a great answer in one word)
हेही वाचा
Gujarat Titans । संघाला फरक पडत नाही! हार्दिक पंड्याबाबत मोहम्मद शमीचे मोठे विधान
मोठी बातमी! देशासाठी 100+ सामने खेळलेल्या अष्टपैलूवर दोन वर्षांची बंदी, बांगलादेश क्रिकेटला मोठा धक्का