---Advertisement---

मोठी बातमी! देशासाठी 100+ सामने खेळलेल्या अष्टपैलूवर दोन वर्षांची बंदी, बांगलादेश क्रिकेटला मोठा धक्का

On: मंगळवार, जानेवारी 16, 2024 7:00 PM
Nasir Hossain
---Advertisement---

बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडूवर आयसीसीवर आयसीसीकडून दोन वर्षांची बंदी घातली गेली आहे. या खेळाडूने देशासाठी 100 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये त्याच्यावर भ्रष्टाचाराचे (मॅच फिक्सिंग) आरोप झाले होते. आता अष्टपैलू खेळाडूरील तीन आरोप योग्य ठरले आहेत. या खेळाडूचे नाव नासिर हुसेन असून त्याने हे तिन्ही आरोप स्वीकार देखील केले आहेत.

बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू नासिर हुसेन (Nasir Hussain) याला एका व्यक्तीकडून भेटवस्तू मिळाली होती. माहितीनुसार या भेटवस्तूच्या बदल्यात खास मागणी देखील केली गेली होती. पण हुसेनकडून याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्ड किंवा ऍन्टी करप्शन ऑफिसरला कुठलीच माहिती दिली गेली नाही. तसेच तपासादरम्यान अष्टपैलू खेळाडूकडून अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यात आले नाही, असेही सांगितले जात आहे. याच कारणास्तव आता नासिर हुसेन दोन वर्ष क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याच्यावर आयसीसीकडून 7 एप्रिल 2025 पर्यंत बंदी घातली गेली आहे.

अनुच्छेद 2.4.3 चे उल्लंघन – हुसेनला 750 यूएस डॉलर्सपेक्षा जास्त किंमत असलेला आयफोन 12 भेट म्हणून दिला गेला होता. त्याने ही माहिती ऍन्टी करप्शन अधिकाऱ्याला देने अपेक्षित होते. पण अष्टपैलू खेळाडू या अमिशाला बळी पडल्याचे दिसते. त्याने या भेटवस्तूबाबत कुठलीच माहिती क्रिकेट बोर्ड किंवा ऍन्टी करप्शन अधिकाऱ्याला दिली नाही.

अनुच्छेद 2.4.4 चे उल्लंघन – नासिर हुसैनने ऍन्टी करप्शन ऑफिसरला कुठल्याच अनोळखी व्यक्तिकडून भेटवस्तू मिळाल्याचे सांगितले नाही. त्याचसोबत भ्रष्टाचाराचा (मॅच फिक्सिंग) प्रस्ताव स्वीकारणे आणि याविषयी सर्व माहिती अधिकाऱ्यांपासून लपवून ठेवण्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे.

अनुच्छेद 2.4.6 चे उल्लंघन – ऍन्टी करप्शन अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना हुसेनकडून त्याला योग्य प्रतिसाद देखील मिळाला नाही. तसेच या प्रकरणाशी संबंधित महत्वाची माहिती त्याने दिली नाही, असे सांगितले जात आहे. त्यान काही महत्वाची कागदपत्रेही अधिकाऱ्यांना दिली नाहीत.

क्रिकेटमधील भ्रष्टाचारात सामील असलेल्या नासिर हुसेन याची क्रिकेट कारकीर्द मोठी राहिली आहे. त्याने बांगलादेशकडून 19 कसोटी, 65 वनडे आणि 31 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत 1044, वनडेत 1281 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 370 धावा केल्या आहेत. गोलंदाजाच्या रुपात त्याला 8 कसोटी, 24 वनडे आणि 7 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स मिळाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –
‘वेगळं काही करण्याची गरज नाही…’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा फलंदाजी सुधारण्यासाठी गिलला सल्ला
अर्रर्र!!! कूणालाही नको असलेला रेकॉर्ड होणार रोहितच्या नावावर, T-20 Internationals मध्ये ओढवू शकते नामुष्की

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---