---Advertisement---

एका वर्षात कमिन्सने शक्य ते सर्व मिळवलं! डिसेंबरमधील कामगिरीची आयसीसीकडून दखल

Pat-Cummins-And-Team
---Advertisement---

पॅट कमिन्स नोव्हेंबर 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पूर्णवेळ कसोटी कर्णधार बनला. टिम पेन याच्या तडकाफडकी निवृत्तीनंतर वेगवान गोलंदाजाला ही जबाबदारी सोपवली गेली. कर्णधार कमिन्सच्या म्हणून नियुक्तीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण मागच्या एका वर्षात त्याने सर्व प्रश्नांची उत्तर आपल्या प्रदर्शनातून दिली आहेत. डिसेंबर 2023मधील आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन कर्णधार प्लेअर ऑफ द मंथ देखील ठरला आहे.

आयसीसीने मागच्या आढवड्यात ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कासाठी नामांकने जाहीर केली होती. पॅट कमिन्स (Pat Cummins) या तीन केळाडूंच्या यादीत प्रबळ दावेदार मानला जात होता. मंगळवारी (16 जानेवारी) आयीसीसीकडून पुरस्कार घोषित झाला, तेव्हा चाहत्यांचा हा अंदाज खरा ठरला. कमिन्सला डिसेंबर 2023 मधील आपल्या प्रदर्शनासाठी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर केला गेला. कमिन्सने मागच्या महिन्यात पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली.

तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पाकिस्तान संघाला यजमान ऑस्ट्रेलियाकडून व्हाईट वॉश मिळाला. कमिन्सने या मालिकेतील पहिल्या सामन्यात 3, दुसऱ्या सामन्यात 10, तर तिसऱ्या सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. यात तीन वेळा त्याने डावात पाच विकेट्सचे कमाई केली. ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे हे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाचे लक्ष वेधून घेणारे होते. आयसीसीनेही या प्रदर्शनाची दखल घेत मंगळवारी त्याला बक्षीस दिले.

दरम्यान, कमिन्ससाठी मागचे एक वर्ष कदाचीत एखाद्या कर्णधासाठी गेलेले सर्वोत्तम वर्ष असू शकते. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा कमिन्सच्या नेतृत्वात मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाने जिंकली. ऑस्ट्रेलियन संघाचे 2023 मधील हे पहिले सर्वात मोठे यश ठरले. त्याव्यतिरिक्त कमिन्सच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने मागच्या वर्षीचा वनडे विश्वचषक देखील जिंकला. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्याव्यतिरिक्त ऍशेस 2023 मध्ये त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकाही बरोबरीत सोडवली होती. इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी डिसेंबर 2023 मध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. या लिलावात देखील कमिन्सला 20.50 कोटी रुपयांमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने खरेदी केले. कमिन्स आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. (Pat Cummins named as a Player of the Month for December 2023)

महत्वाच्या बातम्या – 
Kane Williamson । पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला धक्का! कर्णधार संपूर्ण मालिकेतून बाहेर
‘हा’ संघ झिंबाब्वे क्रिकेटचे भाग्य उजळवेल; कर्णधाराने केले संघाचे कौतुक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---