आयसीसी वनडे विश्वचषक 2023 यावर्षी भारतात खेळला जात आहे. यजमान भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत जोरदार फॉर्म दाखवताना दिसला आहे. गुरुवारी (17 ऑक्टोबर) भारत आणि बांगलादेश यांच्यातील रोमांचक सामना खेळला गेला. विराट कोहली याच्या शतकामुळे चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन देखील झाले. पण याच सामन्यादरम्यान, पुण्यातील स्टेडियमवर घडलेला एक गैरप्रकार समोर येत आहे.
भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील विश्वचषक सामना गुरुवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. भारताने या सामन्यात 7 विकेट्स राखून विजय मिळवला. बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सच्या नुकसानावर 256 धावांची खेली केली होती. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य 41.3 षटकांमध्ये तीन विकेट्सच्या नुकसानावर गाठले. विराट कोहली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला, ज्याने 97 चेंडूत 103 धावांची खेळी केली.
स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी या सामन्याचा पुरेपूर आनंद घेतला. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतात विश्वचषक पाहाण्यासाठी आलेल्या विदेशी चाहत्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याचे बोलले जात आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भारतीय संघाची जर्सी घातलेले काहीजण बांगलादेशी चाहत्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहेत. भारतीय जर्सीतील लोकांच्या हातात बांगलादेश क्रिकेट संघाचा वाघ दिसत आहे. त्यांनी या वाघाची दुर्दशा केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील यावर पाहायला मिळत आहेत.
🚨 Another disrespectful incident.
Bangladesh’s Tiger Shoaib was harassed by some Indian fans and his tiger was also torn apart. Such things are really not ideal. #CWC23 pic.twitter.com/kDjDfvuX1a
— Saif Ahmed 🇧🇩 (@saifahmed75) October 21, 2023
दरम्यान, गुरुवारच्या सामन्यात जिंकल्यानंतर गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या, तर पराभूत झालेला बांगलादेश संघ सातव्या क्रमांकावर आहे. भारताने विश्वचषकातील सुरुवातचे चारही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशने चार पैकी फक्त एक सामना जिंकला आहे. भारताला आपला पुढचा सामना रविवारी (21 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. तर बांगलादेश आपला पुढचा सामना मंगळवारी (24 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळणार आहे. (Misbehavior with Bangladesh fan in Pune)
महत्वाच्या बातम्या –
इतिहास घडला! आख्खा संघ 29 धावांवर All Out, एकाही फलंदाजाने केली नाही 10 Run करण्याची डेरिंग
खर्याला मरण नाही! विश्वचषक संघात संधी न मिळालेल्या सॅमसनची बॅट पुन्हा चमकली