सध्या सुरू असलेल्या वनडे विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आपले पहिले चारही सामने जिंकले आहेत. अशात आता भारतीय संघाला आपला पुढील सामना गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा यालाच थेट आपण हा सामना जिंकू का असा सवाल केला.
विश्वचषक सामन्यांमध्ये भारतीय संघाला नेहमीच न्यूझीलंडविरुद्ध आव्हानांचा सामना करावा लागला आहे. 2019 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर 2021 च्या टी20 विश्वचषकातही संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागलेला. वनडे विश्वचषकात भारताने अखेरच्या वेळी 2003 मध्ये न्यूझीलंडला पराभूत केलेले.
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यानंतर गिल याने याचीच आठवण कर्णधार रोहितला करुन दिली. मुलाखतकाराच्या भूमिकेत असलेल्या गेल्याने रोहितला
“आपण यावेळी न्यूझीलंडविरुद्ध विजय नक्की समजायचा का?”
त्यावर उत्तर देताना रोहित म्हणाला,
“आपण असे क्रिकेट खेळत नाही. या गोष्टी निश्चितपणे कोणीही सांगू शकत नाही. आपण मैदानावर पोहोचल्यावर हे बघू आणि क्रिकेट खेळू. आम्ही फार पुढचा विचार करत नाही. याआधीच्या सामन्यांचे निकाल आमच्या बाजूने लागले नाहीत पण मैदानावर काय होते ते आम्ही पाहू.”
भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानचा हा सामना रविवारी (22 ऑक्टोबर) खेळला जाईल. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना जाईल.
(Shubman Gill Ask To Rohit Sharma We Will Win Against Newzealand)
महत्वाच्या बातम्या –
इतिहास घडला! आख्खा संघ 29 धावांवर All Out, एकाही फलंदाजाने केली नाही 10 Run करण्याची डेरिंग
खर्याला मरण नाही! विश्वचषक संघात संधी न मिळालेल्या सॅमसनची बॅट पुन्हा चमकली