---Advertisement---

वर्ल्डकपच्या धामधुमीत आयपीएलबाबत मोठी बातमी, वाचा नक्की काय घडलं

---Advertisement---

सध्या भारतात व संपूर्ण जगभरात क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहे. भारतातील दहा शहरांमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत कमालीचे अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत. असे असतानाच आता इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2024 बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

जगातील सर्वात यशस्वी लीग क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएलचा पुढील हंगाम 2024 च्या एप्रिल व मे महिन्यात खेळला जाईल. मात्र, यावेळी ही स्पर्धा भारतात होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात होते. याच काळात भारतात सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. त्यामुळे भारत सरकार आयपीएस सामन्यांना सुरक्षा पुरवणार नाही अशा प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, आता याबाबत बीसीसीआयकडून प्रतिक्रिया आल्याचे सांगण्यात येत आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, पुढील वर्षी होणारी आयपीएल 2024 ही संपूर्णपणे भारतातच होईल. सार्वत्रिक निवडणुका असल्या तरी स्पर्धा भारतातच होईल. सुरक्षेचा कोणताही मुद्दा उपस्थित होणार नाही.

यापूर्वी दोन वेळा बीसीसीआयवर निवडणुकांच्या कारणाने आयपीएल बाहेर आयोजित करण्याची वेळ आली होती. 2009 मध्ये आयपीएलचा दुसराच हंगाम संपूर्णपणे दक्षिण आफ्रिकेत खेळवला गेला होता. त्यानंतर 2014 हंगामातील सुरुवातीचे काही सामने याच कारणाने युएई येथे झालेले.

(India Will Host 2024 IPL There Is No Other Country For Hosts)

हेही वाचा-
‘मी पाकिस्तान झिंदाबाद बोलणार…’, बंगळुरूत पोलीस अन् चाहत्यामध्ये राडा- व्हिडिओ तुफान व्हायरल
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! कॅप्टन बावुमा संघातून बाहेर, ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---