---Advertisement---

एका कसोटीने प्रज्ञान ओझांची खुर्ची वाचवली; नाहीतर ‘हा’ माजी क्रिकेटपटू बनला असता मुख्य निवडकर्ता!

On: मंगळवार, ऑक्टोबर 20, 2026 12:00 PM
---Advertisement---

माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय पुरुष वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कायम राहणार. बीसीसीआयने सोमवारी (१९ ऑक्टोबर) याबाबत अधिकृत निवेदन जाहीर केले. ओझा यांच्या आधी अजित आगरकर हे या पदावर होते, त्यांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर रोजी संपल्याने ओझा हंगामी प्रमुख बनले होते. आता ओझा हेच या पदावर कायम राहणार आहेत.

निवड समितीमध्ये आगरकरांची जागा पश्चिम विभागातील रमेश पोवार यांनी घेतली. पोवार यांनी भारतीय संघाचे दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. ओझा यांची मुख्य निवडकर्ता म्हणून निवड ही कसोटी सामन्यांच्या संख्येच्या आधारावर झाली. याचा अर्थ असा की आताच्या पाच सदस्यांच्या समितीमध्ये ज्याने सर्वाधिक कसोटी सामने खेळले, त्याला मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्त केले आहे.

एका कसोटीमुळे ओझांची खुर्ची वाचली
दक्षिण विभागातील असलेल्या ४० वर्षीय ओझा यांचे मुख्य निवडकर्ता पद केवळ एका कसोटी सामन्यामुळे वाचले. ते कसे काय, हे जाणून घेऊ.

ओझा यांनी आपल्या पाच वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण २४ कसोटी, १८ एकदिवसीय आणि ६ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तसेच समितीमध्ये असणारे शिव सुंदर दास, जे पूर्व विभागाचे माजी फलंदाज असून त्यांनी भारतासाठी २३ कसोटी आणि ४ एकदिवसीय सामने खेळले. यावरून या दोघांमध्ये केवळ एका कसोटी सामन्याचा फरक आहे, ज्यामुळे ओझा हे मुख्य निवडकर्ता म्हणून कायम राहिले.

तसेच समितीत आरपी सिंग आणि अजय रात्रा यांचाही समावेश आहे. माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग हे मध्य विभागाचे असून त्यांनी १४ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि १० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रात्रा जे उत्तर विभागाचे असून त्यांनी भारतासाठी ६ कसोटी आणि १२ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

(A single Test match saved Pragyan Ojha’s position; otherwise, ‘this’ former cricketer would have become chief selector, BCCI Men’s Selection Committee)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---