भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने रविवारी (5 नोव्हेंबर) वनडे कारकिर्दीतील 49 वे शतक केले. वनडे विश्वचषक 2023 मधील 37 वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर विराटने शानदार शतक करत भारताची धावसंख्या उंचावली. पण अशातच श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस याने दिलेल्या एका विधानामुळे नवा वाद सुरू झाला.
श्रीलंकेच्या वनडे संघाचा कर्णधार दासून शनाका वनडे विश्वचषकात संघाचे नेतृत्व करत होता. मात्र, मागच्या काही सामन्यांमध्ये शनाका खेळू शकला नाहीये. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला विश्वचषकातून माघार घ्यावी लागली. त्याच्या अनुपस्थितीत कुसल मेंडिस श्रीलंकेचे नेतृत्व करत आहे. श्रीलंकन संघाला आपला पुढचा सामना बंगालदेशविरुद्ध सोमवारी (6 नोव्हेंबर) खेळायचा आहे. त्याआधी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कुलस मेंडिस याने विराटबाबत एक असे विधान केले, ज्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
कर्णधाराची भूमिका पार पाडणाऱ्या कुसल मेंडिस याला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला की, “विराटने शतक केले आहे, त्याला शुभेच्चा द्यायला आवडेल का?” या प्रश्नावर मेंडिसने मात्र उत्तर दिले, “मी विराटला शुभेच्छा का देऊ?” कुसल मेंडियच्या या विधानामुळे सोशल मीडियावर चाहत्यांच्या वेगेवगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी मेंडिसचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले, तर काहींच्या मते पत्रकारानेच चुकीच्या वेळी प्रश्न विचारला होता.
Journalist: Virat Kohli completed his 49th hundred. Would you like to congratulate him?
Kusal Mendis: why would I congratulate him?#INDvSA #INDvsSA #CWC2023 pic.twitter.com/VCTVHzpqWA
— Shaharyar Ejaz ???? (@SharyOfficial) November 5, 2023
दरम्यान, विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेल्या शतकामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्सच्या नुकसानावर 326 धावांपर्यंत मजल मारू शकला. श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाव्यतिरिक्त यात सलामीवीर रोहित शर्मा याच्या 40, तर रविंद्र जडेजा याच्या 29* धावा महत्वाच्या ठरल्या. (A Sri Lankan who flatly refused to congratulate Virat after his century)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी
महत्वाच्या बातम्या –
मायभूमीत विराटने घडवला इतिहास! सचिननंतर बनला जगातला दुसराच फलंदाज, यादी संपली
जडेजाने पार पाडली फिनिशरची भूमिका, विराटच्या शतकामुळे भारताची 326 धावांपर्यंत मजल