यंदाचा महिला टी20 विश्वचषक ऑक्टोबर 2024 मध्ये खेळला जाणार आहे. यामध्ये 10 संघांनी सहभाग नोंदवला आहे. टी20 विश्वचषकाची ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार आहे. हा शेवटचा टी20 विश्वचषक असेल, ज्यामध्ये 10 संघांनी सहभाग नोंदवला आहे. तर 2030 मध्ये होणाऱ्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत संघांची संख्या 16वर पोहोचणार आहे. अशी आयसीसीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
याआधी महिला टी20 विश्वचषकात केवळ 8 संघ सहभागी झाले होते. त्यानंतर त्यात वाढ करण्यात आली आणि 2016 मध्ये 10 संघांमध्ये विजेतेपदाची लढत झाली. 2026 मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेत 12 संघ सहभागी होणार आहेत. याशिवाय टी20 विश्वचषक 2026 साठी कट ऑफ डेट 31 ऑक्टोबर 2024 असेल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
In line with ICC’s dedication to equity in cricket, the Women’s T20 World Cup 2030 will feature more teams than ever before 🙌
More from the Annual Conference 👇https://t.co/o0ZsOTH9Kb
— ICC (@ICC) July 22, 2024
यंदाच्या टी20 विश्वचषकानंतर 2026 मध्ये 12 संघ, 2028 मध्ये 12 आणि त्यानंतर 2030 मध्ये 16 संघ सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (ICC) 2030 मध्ये होणाऱ्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत 16 संघांच्या समावेशाची पुष्टी केली आहे. 2026 मध्ये पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत 12 संघ सहभागी होणार आहेत.
मुख्य कार्यकारी समितीने (CEC) देखील पुष्टी केली आहे की, 2 वर्षांनंतर होणाऱ्या मेगा इव्हेंटसाठी 8 पात्रता स्पॉट्स कसे असतील. या अंतर्गत आफ्रिका आणि युरोपमधून प्रत्येकी 2 संघ, अमेरिकेतील 1 आणि संयुक्त आशिया आणि ईएपी विभागीय अंतिम स्पर्धेतील 3 संघ तयार केले जातील.
सीईसीनं आयसीसी पुरुष क्रिकेट समितीवर एलिट पॅनल पंच म्हणून पॉल रेफेलच्या नियुक्तीला देखील मान्यता दिली आहे. यादरम्यान, रिची रिचर्डसनच्या समितीत एलिट पॅनेल रेफरी असतील. कोलंबो येथे 19 जुलैपासून आयसीसीच्या वार्षिक परिषदेत इतर अनेक निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सर्व 108 आयसीसी सदस्य उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेले 4 मोठे निर्णय, टी20 विश्वचषकादरम्यान झालं होतं मोठं नुकसान!
आश्चर्यकारक! षटकार मारल्यानंतर खेळाडूला केलं बॅन, क्रिकेटमध्ये हा कुठला आगळा-वेगळा नियम
मितांश, यशश्रीची हॉकी महाराष्ट्र सब-ज्युनियर संघांच्या कर्णधारपदी निवड