पुणे, 27 ऑक्टोबर, 2023: कुंटे चेस अकादमी आणि मिलेनियम नॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या सहकार्याने आयोजित दुसऱ्या मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून एकुण 200 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा मिलेनियम स्कुल, कर्वेरोड येथे रविवार, 29 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.
स्पर्धेच्या संचालिका मृणालिनी कुंटे यांनी सांगितले की, हि स्पर्धा पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेखाली होत आहे. तसेच, हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. पुण्यात बुद्धिबळ खेळाचा प्रसार व्हावा याहेतूने मिलेनियम स्कुलने या स्पर्धेसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
स्पर्धेत 200 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा चार गटात होणार असून यामध्ये कविश लिमये(1209, 9 वर्षाखालील गट), विहान देशमुख(1226, 11 वर्षाखालील गट), श्रेयस पाटील (1317,13 वर्षाखालील गट), शास्वत गुप्ता(1444, 15 वर्षाखालील गट), यांचा समावेश आहे. हि स्पर्धा गटात (9 वर्षाखालील गट), ब गटात (11 वर्षाखालील), क गटात(13 वर्षाखालील) आणि ड गटात( 15 वर्षाखालील गट)अशा गटात ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण 32000/-रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी नितीन शेणवी हे चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेत मानांकित खेळाडूंमध्ये यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, डीव्हीसीए, पूना क्लब संघांचा सलग दुसरा विजय
ईएमएमटीसी – एमएसएलटीए 16 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेस आजपासून प्रारंभ