आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराशाठी नामांकने जाहीर केली आहेत. प्रत्येक महिन्याप्रमाणे चालू महिन्यात देखील पुरुष आणि महिला क्रिकेटमधून प्रत्येकी तीन-तीन खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. विशेष बाब ही की पुरषांच्या पुरुस्कारासाठी निवडलेल्या तीन नामांकनांपैकी दोन खेळाडू पाकिस्तानचे आहेत.
पुरुषांच्या प्लेअर ऑफ द मंथ () पुरस्कारासाठी पाकिस्तानचे दोन आणि वेस्ट इंडीजच्या एका खेळाडूला नामांकन मिळाले आहे. तर महिला क्रिकेटमधून मलेशिया, आयर्लंड आणि नेदरलँड यांच्या प्रत्येकी एका-एका खेळाडूला या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. आयसीसी मेंस प्लेअर ऑफ दम मंथसाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि शादाब खान (Shadab Khan) यांच्यासह वेस्ट इंंडीजचा निकोलस पुरन स्पर्धेत आहे. पाकिस्तानच्या दोघा खेळाडूंना मागच्या महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. तर निकोलस पुरनने मागच्या माहिन्यात मायदेशात भारताविरुद्ध खेळताना चांगले प्रदर्शन केले होते.
महिला क्रिकेटमधून मलेशियाची अष्टपैलू ऍना हमिजा हाशिम, आयर्लंडच्या आरलेन कैली आणि नेदरलँडची सलामीवीर आयरिश ज्वलिंग यांना शॉर्टलिस्ट केले गेले आहे. येत्या काही दिवासांमध्ये आयसीसी पुरुष आणि महिला प्लेअर ऑफ द मंथची घोषणा केली जाईल.
दरम्यान, बाबर आझम याला ऑगस्ट महिन्यासाठी नामांकन मिळताच त्याच्या नावावर खास विक्रम देखील नोंदवला गेला. बाबर या पुरस्कासाठी सर्वाधिक वेळा नामांकित मिळालेला खेळाडू ठरला आहे. त्याला आतापर्यंत 5 वेळा प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले आहे. जो रुट, ऍश्ले गार्डनर, गॅबी लुईस आणि नेट सायव्हर ब्रांट या खेळाडूंची नावे संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. या चौघांनाही प्लेअर ऑफ द मंथसाठी प्रत्येकी चार-चार वेळा नामांकन मिळाले आहे. (A total of six players, including two men from Pakistan, are in the running for the ICC Player of the Month)
महत्वाच्या बातम्या –
जुन्या फॉर्मात परतला भुवनेश्वर कुमार! यूपी टी-20 लीगमध्ये घेतल्या एकापेक्षा एक विकेट्स
पुन्हा दिसले धोनीचे टेनिसप्रेम! यूएस ओपनमधील व्हिडिओ व्हायरल, कार्लोस अल्कारेजच्या जवळ बसलाय भारतीय दिग्गज