---Advertisement---

क्रिकेटचा प्रचार करण्यासाठी जपानची ही अनोखी कल्पना

On: शनिवार, जुलै 28, 2018 2:37 PM
---Advertisement---

उगवत्या सुर्याचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानमध्ये क्रिकेट खेळ पोहचवण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी नुकतेच जपानमध्ये सॅनो क्रिेकेट करी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

या फेस्टिव्हलमध्ये सॅनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट ग्राउंडवर कम्यूनिटी क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. तसेच दक्षिण-पूर्व आशिया (अग्नेय आशिया) मधील सांस्कृतिक कार्यक्रम आणि बांगलादेश, भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंकामधील विविध अन्नपदार्थांचाही या फेस्टिव्हलमध्ये समावेश होता, त्यामुळे याला कार्निव्हलचे वातावरण प्राप्त झाले होते.

ही कल्पना क्रिकेटला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी राबवण्यात आली होती, असे आयोजकांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

जपान हा 2005 पासून आयसीसीचा सहसदस्य देश आहे. तसेच अनेक कार्यांसाठी सॅनो हे मुख्य केंद्र असते.

सॅनो शहराचे खेळ व्यवस्थापक योशमारु सेकीगुची या फेस्टिव्हलबद्दल म्हणाले, “सॅनोमध्ये क्रिकेटला विकसित करण्यासाठी जपान क्रिकेट संघटना कठोर परिश्रम करत आहे. क्रिकेटला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी या फेस्टिव्हलला महत्त्वाचा कार्यक्रम मानतो. आमचा विश्वास आहे की हा खेळ या शहराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देईल.”

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताचे फलंदाज-गोलंदाज चमकले, एकमेव सराव सामना अनिर्णित

लार्ड्सवर कधीही न झालेली गोष्ट झाली, कित्येक वर्षाची परंपरा एमसीसीने केली स्थगित

वाढदिवस विशेष- गॅरी सोबर्सबद्दल कधीही न ऐकलेल्या ५ गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment