पुणे – येथे सुरु असलेल्या १६ वर्षांखालील एसएनबीपी अखिल भारतीय स्तरावरील हॉकी स्पर्धेत शनिवारी वाराणसीच्या ऑलिम्पियन विवेक सिंगने संघर्षपूर्ण लढतीत बेंगळुरूच्या आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनीचा ५-३ असा पराभव केला. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी ५४ गोली नोंद झाली. यात विवेक सिंग अकादमी विरुद्ध आर्मी बॉईज स्पोर्टस कंपनी हा सामना सर्वाधिक चुरशीचा झाला.
एफ गटातील या सामन्यात विवेक सिंग अकादमी संघाने नितेश शर्माच्या गोलने खाते उघडले. त्यानंतर विवेक यादवने ११व्या मिनिटाला आर्मी संघाला बरोबरी राखून दिली. मध्यंतराला सामना १-१ असा बरोबरीत राहिला होता. उत्तरार्धात राहुल यादवच्या गोलने विवेक सिंग अकादमी संघाने आघाडी घेतली. त्यांना ही आघाडी टिकवता आली नाही. तीनच मिनिटांनी दया रामने आर्मी संघाला पुन्हा बरोबरी राखून दिली. सामना सहा गोलपर्यंत ३-३ असा बरोबरीत राहिला. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात सोनु पटेल आणि अजय कुमार गुंड यांनी सात मिनिटांत दोन गोल करून विवेक सिंग संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विवेक सिंग संघाने सब-ज्युनियर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतील पराभवाची परतफेड केले. त्या स्पर्धेत विजेतेपदाच्या लढतीत विवेक सिंग अकादमी संघाला पेनल्टी शूट आऊटमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
जी गटातील सामन्यात आग्रा येथील सुखजीवर अकादमी संघाने ऑलिम्पियन भास्करन हॉकी अकादमी संघाचचा २३-० असा पराभव केला. या सामन्याचे विशेष म्हणजे मनिष कुमारने १० गोल केले. अन्य सामन्यात आर. के. रॉय पाटणा संघाने तमिळनाडू अकादमी संघाचा ६-०, रितु राणी हॉकी अकादमी संघाने मुंबई स्कूल स्पोर्टस संघटनेचा ९-०, ग्रासरुट हॉकी अकदमी संघाने भारयी विद्याभवन संघाचा ७-१ असा पराभव केला.
निकाल –
ई गट : आर.के. रॉय, पाटणा: ६ (आशुतोष पाल 12वे, निकोलस टोप्नो 16वे, 58वे, नितीन 34वे, 51वे, शशांक कुमार 39वे) वि.वि. तामिळनाडू हॉकी अकादमी: 0. मध्यंतर – 2-0.
गट जी : सुखजीवन स्पोर्ट्स अकादमी, आग्रा: 23 (मनीष कुमार 2रे, 25वे 31वे, 35वे, 37वे, 41वे, 49वे, 58वे, 58वे, 59वे, आकाश राजभर 6वे, 20वे, दिव्यांस शर्मा 7वे, 27वे, 47वे, अनुराग यादव 9वे; कुणाल सिंग 14वे, 47वे नितीन 16वे (पीएस), आयुष भट्ट 26वे, 43वे दिनेश शर्मा 29वे अंकित पिप्पल 55वे मिनिट) वि. वि. ऑलिंपियन भास्करन हॉकी अकादमी : ० (मध्यंतर ११-०)
गट एफ : ऑलिंपियन विवेक सिंग अकादमी, वाराणसी : 5 (विवेक यादव 11वे; राहुल यादव 42वे, अर्जुन चौहान 50वे सोनू पटेल 52वे अजय कुमार गोंड 59वे) वि.वि. आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी , बेंगळुरू; 3 (नितेश शर्मा 5वे; दया राम 45वे, 51वे मिनिट) मध्यंतर १-१
गट क: रितू राणी हॉकी अकादमी, वाराणसी: 9 (सुनील 2रे; अमनदीप 6वे, 16वे, 28वेनितीन 29वे, 37वे, आकाश 39वे, 41वे ; साहिल मोटे ४५वे) वि.वि. मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन, मुंबई: ०. मध्यंतर ३-०
पूल-एच: ग्रासरूट हॉकी: ७ (सूरज कुमार 4थे, 39वे, 48वे, वीरेंद्र कोरंगा 16वे, रोहित एअरी 44वे, , 45वे, 50वे) वि.वि. भारतीय विद्या भवन, कोडागु, केरळ: 1 (बोपय्या 24वे). मध्यंतर १-१