मंगळवारी (29 ऑगस्ट) भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केएल राहुल आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, असे जाहीर केले. पूर्ण तंदुरुस्त नसतानाही त्याला भारतीय संघात सामील केले गेल्याने अनेक माजी क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशात आता भारताचा माजी क्रिकेटपटू व समालोचक आकाश चोप्रा याने आपल्या एक्स हँडल वरून काही प्रश्न विचारले आहेत.
KLR unavailable for the first two games. Opens up a host of discussion points…does Ishan open? If yes, where will Shubman bat? Or Rohit-Gill-Ishan bat 1-2-3 and then Kohli bats at 4? Or Rohit-Gill open…Kohli at 3 and Ishan at 5? Or Gill gets benched and Tilak/SKY bat at 5?…
— Aakash Chopra (@cricketaakash) August 29, 2023
राहुल नेपाळ व पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाल्यानंतर आकाश चोप्रा याने आपल्या एक्स हॅण्डल वरून एक पोस्ट करताना काही प्रश्न विचारले. त्याने लिहिले,
‘राहुल बाहेर झाल्यानंतर आता काही चर्चा करता येईल. ईशान किशन सलामीला येईल का? तसे झाल्यास शुबमन गिल कोणत्या क्रमांकावर खेळेल? रोहित, गिल व ईशान पहिल्या तीनमध्ये तर विराट चौथ्या क्रमांकावर खेळेल का? ईशान पाचव्या क्रमांकावर दिसू शकतो का? की सूर्या व तिलक पैकी कोणी पाचव्या क्रमांकावर खेळेल?
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी 21 ऑगस्ट रोजी आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) साठी संघाची घोषणा केली. या संघात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनाही सामील केले गेले होते. असे असले तरी, राहुलच्या फिटनेसबाबत शंका या दोघांकडून व्यक्त केली गेली होती. आता झाले देखील अगदी तसेच. फिटनेसच्या कारणास्तव राहुल पहिल्या दोन सामन्यात खेळू शकणार नाही. राहुलच्या अनुपस्थितीत ईशान किशन (Ishan Kishan) यष्टीरक्षक म्हणून उभा राहण्याची पूर्ण शक्यता आहे.
(Aakash Chopra Ask Questions After KL Rahul Unavailable For Asia Cup 2 Matches)
महत्वाच्या बातम्या –
मोठ्या टी-20 लीगसाठी स्मृती मंधानाचा नकार! खेळणार मायदेशातील महत्वाची मालिका
आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 ऍक्टिव्ह प्लेअर्स, ‘हा’ भारतीय फिरकीपटू टॉपवर