इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील १०वा सामना आज (२८ सप्टेंबर) दुबई येथे खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडयिन्स संघात हा सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील तिसरा सामना आहे.
बेंगलोर संघाच्या या हंगामातील दूसऱ्या सामन्याविषयी बोलायचं झालं तर, किंग्स इलेव्हन पंजाबने बेंगलोरचा दारुण पराभव केला होता. आजवर एकदाही आयपीएल ट्रॉफी न जिंकलेल्या बेंगलोर संघाची सर्वात मोठी कमजोरी ही त्याची गोलंदाजी राहिली आहे. त्यांच्या याच उणिवेमुळे बेंगलोर पंजाबविरुद्ध तब्बल ९७ धावांनी पराभूत झाला होता.
दिग्गज भारतीय समालोचक आकाश चोप्रा यानेही बेंगलोर संघाच्या गोलंदाजीला त्यांच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले आहे. सोबतच त्याने संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याचाही सल्ला दिला आहे.
आपल्या यूट्युब चॅनलवर बोलताना चोप्रा म्हणाला की, “बेंगलोर संघाने सनरायझर्स हैद्राबादविरुद्धचा त्यांचा पहिला सामना जिंकला होता. परंतु पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्यांचा खूप वाईट पराभव झाला होता. बेंगलोरच्या खेळाडूंनी कित्येक झेल सोडले, त्यांची गोलंदाजी खूप साधारण होती आणि फलंदाजीतही ते चांगली कामगिरी करु शकले नाहीत.”
“माझ्या मते आजच्या सामन्यात बेंगलोरचे संघ व्यवस्थापक एबी डिविलियर्सला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवतील. तर जोश फिलिपच्या जागी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोईन अलीला संधी दिली जावी. याव्यतिरिक्त डेल स्टेनलाही विश्रांती देण्यात यावी आणि त्याच्या ठिकाणी इसुरु उडानाला खेळवण्यात यावे. तर उमेश यादवच्या ठिकाणी मोहम्मद सिराजला संधी देण्यात यावी,” असे चोप्राने पुढे बोलताना म्हटले.
शेवटी बोलताना चोप्रा म्हणाला की, “इसुरु उडाना, युझवेंद्र चहल आणि नवदीप सैनी यांना शेवटची ६ षटके टाकण्यासाठी द्यावी. ते तिघेही प्रत्येकी २-२ षटके टाकतील. जर बेंगलोर संघाने असे केले नाही, तर त्यांना अजून जास्त समस्यांचा सामना करावा लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
-दिनेश कार्तिकचं नेतृत्व धोक्यात? ‘या’ खेळाडूला कर्णधार करण्याची जोरदार मागणी
-७ षटकारांची बरसात केलेल्या राहुल तेवतियाने केली सॅमसन, राणाची बरोबरी
-फक्त १० धावा आणि मुंबईचा कर्णधार आयपीएलच्या ‘मोठ्या’ विक्रमाला घालणार गवसणी
ट्रेंडिंग लेख-
-३ सलामीवीर जे या आयपीएल हंगामात करु शकतात खालच्या क्रमांकावर फलंदाजी
-‘या’ पाच कारणांमुळे राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबवर मिळवला ऐतिहासिक विजय
-आयपीएलमध्ये सर्वात वेगवान २ हजार धावा करणारे ३ भारतीय फलंदाज