आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण भारतीय संघ चॅम्पियन्स ट्राॅफीचे आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. तत्पूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ अद्याप घोषित झाला नाही. दरम्यान आता माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) भारतीय संघातील निवडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “वरूण चक्रवर्ती प्रत्येक सामन्यात विकेट घेत आहे. त्याने विजय हजारे ट्राॅफीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. वरूणने राजस्थानविरूद्ध पाच विकेट्स देखील घेतल्या आहेत. तो प्रभावी कामगिरी करत आहे. भारतीय संघात परतल्यापासून तो प्रत्येक सामन्यात विकेट घेत आहे.”
पुढे बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “अफवांचा बाजार तापला आहे. भारतीय क्रिकेटचे वातावरण देखील तापले आहे. कारण आम्हाला अनेक स्त्रोत आधारित बातम्या मिळतात आणि त्यातील काही खऱ्याही आहेत, की चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी वरूण चक्रवर्तीची निवड होऊ शकते. पण जर त्याची निवड झाली, तर कोणता खेळाडू बाहेर होणार रविंद्र जडेजा, ही गोष्ट मी ऐकली आहे.”
वरूण चक्रवर्तीच्या (Varun Chakaravarthy) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी फक्त टी20 फाॅरमॅट खेळला आहे. त्याने 13 टी20 सामन्यातील 13 डावात गोलंदाजी करताना 19 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 18.05 राहिली आहे, तर इकाॅनाॅमी रेट 6.79 राहिला आहे. 17 धावात 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल मेगा लिलावात अनसोल्ड ठरल्यानंतर ‘या’ 3 दिग्गजांची दमदार कामगिरी
मोहम्मद शमी परतला, पंतला विश्रांती! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा! आफ्रिकेविरूद्धच्या पराभवानंतर संघात मोठे बदल