मागील अनेक महिन्यांपासून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या भविष्याबद्दल चर्चा होत आहे. अनेकदा धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार का असेही प्रश्न विचारले जात आहेत. धोनी २०१९ च्या विश्वचषकात शेवटचे खेळला आहे. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती.
याबरोबरच मागील काही दिवसात दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबदद्लही चर्चा झाल्या. त्याने २०१८ मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तो निवृत्तीचा निर्णय मागे घेत पुनरागमन करु शकतो, अशी चर्चा होती.
त्यामुळे नुकतेच धोनी आणि डिविलियर्सच्या पुनरागमनाबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने त्याच्या युट्यूब चॅनेलवर त्याचे मत स्पष्ट केले आहे.
आकाश धोनीबद्दल म्हणाला,”जेव्हा एमएस धोनीच्या बाबतीत गोष्ट असते तेव्हा ती फक्त त्यालाच माहित असते. त्याच्या फॉर्मबद्दल बोलण्यासारखे काही नाही, कारण तो आता एक वर्ष खेळलेला नाही आणि फॉर्मबद्दल काय सांगायचे? मला वाटत नाही की त्याची पुनरागमन आयपीएलवर अवलंबून आहे. जर त्याला खेळायचे असेल आणि स्वत: ला संघनिवडीसाठी उपलब्ध करेल. जर भारतीय निवड समीतीने त्याला निवडले असेल तर तो ठिकच असेल.”
तसेच एबी डिविलियर्सबद्दल आकाश म्हणाला, “एबीडीचा फॉर्म अद्याप चांगला आहे. त्याचे पुनरागमन सुलभ आहे. लवकरच आपण त्याला पुन्हा खेळताना पाहू शकतो. जर यावर्षी टी२० विश्वचषक झाला, तर त्याला (दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना) पाहू शकतो आणि जरी पुढीलवर्षी २०२१ मध्ये हा विश्वचषक झाला तरी मला वाटत नाही की त्याला खेळण्यासाठी काही समस्या असेल. यात काही शंका नाही की तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल.”
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर टी२० विश्वचषक २०२० आयसीसीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेला आयपीएलचा १३ मोसम आयोजित करण्यासाठी बीसीसीआयचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जर या मोसमाचे आयोजन झाले तर धोनी आणि डिविलियर्सला पुन्हा मैदानात पहाण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे. तसेच डिविलियर्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा प्रमुख खेळाडू आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
खुशखबर! कोहली आणि कंपनी आयपीएलपुर्वी खेळणार या देशाविरुद्ध ३ टी२० सामने?
आयपीएलमध्ये भल्याभल्यांना रडवणारा मुंबई इंडियन्सचा शिलेदार म्हणतोय, यावेळी माझं खेळायचं नाही पक्कं
टेन्शन वाढलं! क्रिकेटमधील उभारता सितारा सगल चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह