आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी आयसीसीने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 8 संघांना त्यांचे संघ जाहीर करण्यासाठी 12 जानेवारी ही शेवटची तारीख दिली आहे. तसेच यानंतर, संघांना कोणत्याही परवानगीशिवाय एक महिन्यासाठी संघात बदल करण्याची संधी असेल. अशा परिस्थितीत संघ जाहीर होण्यासाठी फारसा वेळ शिल्लक नाही. या दरम्यान भारतीय चाहत्यांच्या नजरा टीम इंडियावर असतील. बीसीसीआय 12 जानेवारी रोजीच संघाची घोषणा करेल असे वृत्त आहे. अशा परिस्थितीत, क्रिकेट पंडित स्वतःचे संघ निवडत आहेत. आकाश चोप्राने 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपलाही संघ जाहीर केला आहे.
आकाश चोप्राच्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या संघात पहिले नाव कर्णधार रोहित शर्माचे आहे. त्याने शुबमन गिलला त्याचा सलामीचा जोडीदार म्हणून निवडले आहे. तर यशस्वी जयस्वाल बॅकअप ओपनर असेल. मधल्या फळीची जबाबदारी विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि रिषभ पंत यांच्यावर असेल. आता यष्टीरक्षक म्हणून सुरुवातीला केएल राहुल किंवा रिषभ पंत दोघांपैकी कोणाला स्थान मिळते हे पाहणे रंजक असेल.
तर अष्टपैलू खेळाडू म्हणून आकाश चोप्राने संघात हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना निवडले आहे. एकमेव स्पेशालिस्ट लेग स्पिनर कुलदीप यादवसह, आकाश चोप्राने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग हे चार वेगवान गोलंदाज निवडले आहेत.
आकाश चोप्राचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संघ – रोहित शर्मा, शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
हेही वाचा-
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेणारे टॉप 3 संघ, यादीत भारताचा समावेश?
टीम इंडियासाठी विराट कोहली आरसीबीला धक्का देणार का? इंग्लंड दौऱ्यासाठी घेणार मोठा निर्णय
रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर, पहिल्यांदाच इंग्लंडशी सामना, पाहा कोणाचं पारडं जड