---Advertisement---

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी माजी क्रिकेटरने केली टीम इंडियाची निवड; पाहा कोणा-कोणाला दिले स्थान

On: सोमवार, जुलै 27, 2020 1:45 PM
---Advertisement---

भारतीय संघ या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी, ३ वनडे आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघाचा माजी सलामी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने आपला ३० जणांचा संघ निवडला आहे. आपल्या या संघात त्याने तिन्ही क्रिकेट प्रकारांसाठी काही खेळाडू, तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी ६ खेळाडूंची निवड केली आहे. यापूर्वी भारतीय संघाचे माजी निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी २६ खेळाडूंची निवड केली होती.

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर १४ दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यामुळे चोप्राने (Aakash Chopra) मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी संघाची निवड केली आहे. जे या दौऱ्यासाठी एकत्र प्रवास करू शकतात.

चोप्राने सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांची निवड केली आहे. तरीही त्याचे असे मत आहे की, कसोटी मालिकेत शॉ आणि अग्रवाल हे चांगली कामगिरी करतात, तर त्यांनी संपूर्ण दौऱ्यासाठी थांबविण्यात येऊ शकते किंवा कसोटी मालिकेनंतर त्यांना पुन्हा पाठविले जाऊ शकते.

मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी चोप्राने चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, हनुमा विहारी, शुबमन गिल, श्रेयस अय्यर यांची निवड केली आहे. यामध्ये त्याने म्हटले की, कसोटी मालिकेनंतर पुजारा आणि रहाणेला परत पाठविले जाऊ शकते.

अय्यरबाबत चोप्रा म्हणाला, “मी अय्यरकडे कसोटी क्रिकेटमध्ये एक पर्याय म्हणून पाहतो. फलंदाजीत कोणतीही अडचण असेल, तर अय्यर आहेच की. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये का निवडले जाऊ शकत नाही, विशेषत: त्याचा प्रथम श्रेणीतील आकडे चांगले आहेत.”

कसोटी मालिकेसाठी चोप्राने रिषभ पंत आणि वृद्धिमान साहाला यष्टीरक्षक म्हणून निवडले आहे. त्याचा असा विश्वास आहे की पंत मर्यादित षटकाच्या क्रिकेटसाठीही उपलब्ध असेल तसेच केएल राहुलही एक पर्याय असेल.

वाचा- धीरज जाधव- गुणवत्ता असून देशासाठी खेळू न शकलेला महाराष्ट्राचा महारथी

चोप्राने हार्दिक पंड्याला अष्टपैलू म्हणून निवडले आहे.

या दौऱ्यासाठी चोप्राने ४ फिरकीपटूंची निवड केली आहे. यामध्ये आर अश्विन, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांचा समावेश आहे. त्याने म्हटले की, चहलला कसोटी क्रिकेटसाठी संघात घेतले पाहिजे.

चोप्राने वेगवान गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, नवदीप सैनी, उमेश यादव आणि दीपक चाहर यांची निवड केली आहे.

याव्यतिरिक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी चोप्राने शिखर धवन, मनीष पांडे, केदार जाधव, शार्दुल ठाकूर, कृणाल पंड्या आणि राहुल चाहर यांना निवडले आहे.

आकाश चोप्राने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेला ३० जणांचा भारतीय संघ-

सलामीवीर- रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, केएल राहुल

मधली फळी- चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, हनुमा विहारी, शुबमन गिल, श्रेयस अय्यर

यष्टीरक्षक फलंदाज- वृद्धिमान साहा, रिषभ पंत

फिरकीपटू- आर अश्विन, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव

वेगवान गोलंदाज- भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, नवदीप सैनी, उमेश यादव आणि दीपक चाहर, हार्दिक पंड्या

मर्यादित षटकांसाठी खेळाडू- शिखर धवन, मनीष पांडे, केदार जाधव, शार्दुल ठाकूर, कृणाल पंड्या आणि राहुल चाहर

महत्त्वाच्या बातम्या- 

युवराज सिंगचा गंभीर आरोप; माझ्याबरोबर केला गेला गैरव्यवहार, असं नक्कीच अपेक्षित नव्हतं

आयपीएल चाहत्यांसाठी खुशखबर! आता थेट मैदानात पाहता येणार सामने

सुशांत सिंगचा दिल बेचरा पाहून भावुक झाला भारतीय क्रिकेटर, लिहीला अतिशय भावनिक मेसेज

ट्रेंडिंग लेख-

धीरज जाधव- गुणवत्ता असून देशासाठी खेळू न शकलेला महाराष्ट्राचा महारथी

या ३ युवा खेळाडूंना आयपीएल २०२० स्पर्धा ५ महिने पुढे गेल्याने होणार फायदा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद झाला आहे सचिन, ६६३ वेळा पॅव्हेलियनचा रस्ता धरलाय या खेळाडूने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---