भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू आकाश चोप्रा (aakash chopra) नेहमी क्रिकेटजगतातील घडामोडींविषयी व्यक्त होत असतात. आता आकाश चोप्रांनी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (rohit sharma) याला कसोटी आणि टी२० मधील यावर्षीचा सर्वोत्कृष्ट फलंदाज घोषित केले आहे. आकाश चोप्रांच्या मते, रोहित शर्माने या संपूर्ण वर्षात कसोटी आणि टी२० संघासोबत खेळताना जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी रोहितला वर्षातील सर्वोत्तम फलंदाज देखील म्हटले आहे.
रोहितच्या या संपूर्ण वर्षाच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये ४७.६८ च्या सरासरीने ९०६ धावा केल्या आहेत. तसेच टी२० मध्ये त्याने ३८.५४ च्या सरासरीने आणि १५०.८८ च्या स्ट्राइक रेटने ४२४ धावा केल्या आहेत. त्याच्या या प्रदर्शनासाठी आकाश यांनी रोहितचे कौतुक केले आहे.
आकाश यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओत रोहितचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “अनेक नावे डोक्यात आली. रिषभ पंतचे नाव देखील आले कारण त्याने खूप धावा केल्या आहेत. त्याच्या प्रदर्शनामुळेच भारताने गाबामध्ये विजय मिळवला होता. असे असले तरी, माझा कसोटीतील यावर्षीचा सर्वोत्कृष्ट फलंदाज रोहित शर्मा असेल. कारण त्याने कसोटी सामन्यात अनेक निर्णायक डाव खेळले आहेत. भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर आणि चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील, पहिल्या डावात त्याचे प्रदर्शन अप्रतिम होते. आपण रोहित शर्माची एक वेगळीच फलंदाजी पाहिली.”
पुढे बोलताना आकाश यांनी रोहितला टी२० मधील यावर्षीचा सर्वोत्कृष्ट फलंदाज देखील घोषित केले. “टी२० मध्ये तुम्ही केएल राहुलविषयी चर्चा करता. मात्र, त्याने एवढ्या जास्त धावा केल्या नाहीत. कोहलीनेही एवढ्या धावा केल्या नाहीत. पुन्हा रोहित शर्मा या यादीत सर्वांच्या पुढे आहे. यावर्षी त्याची सरासरी आणि स्ट्राइक रेट दोन्ही वाढले आहे. तो यावर्षी टी-२० संघाचा कर्णधार देखील झाला. त्यामुळे यावर्षीचा टी२० मधील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार मी रोहित शर्माला देईल,” असे आकाश पुढे बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
“२०१९ विश्वचषकातील त्या निर्णयाशी मी सहमत नव्हतो”; रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट
फलंदाज म्हणून ‘हिट’, तर कर्णधार म्हणून ‘सुपरहीट’ ठरलाय रोहित शर्मा; पाहा आकडेवारी
टी-२० नंतर रोहित शर्माच्या गळ्यात भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची माळ