---Advertisement---

IPL Mega Auction; ‘हे’ अष्टपैलू खेळाडू ठरणार सर्वात महागडे! माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा क्रिकेट तज्ज्ञ आकाश चोप्राने (Aakash Chopra) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) मेगा लिलावाबाबत काही अंदाज वर्तवले आहेत. आकाश चोप्राने अशा 5 अष्टपैलू खेळाडूंची निवड केली आहे. जे त्याच्या मते लिलावात सर्वात महागडे ठरतील. या यादीत केवळ एका भारतीय अष्टपैलूला स्थान मिळाले आहे. या बातमीद्वारे आपण आकाश चोप्राच्या यादीतील 5 अष्टपैलू खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

आकाश चोप्राने (Aakash Chopra) आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे, की सॅम करन (Sam Curran) पुन्हा एकदा आयपीएलमधील टॉप-5 सर्वात महागड्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असेल. आकाश चोप्रा म्हणाला, “पंजाब संघ सॅम करनला परत विकत घेऊ शकतो. पण त्याच्या पगारात 50 टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता आहे. मी वॉशिंग्टन सुंदरला भारतीय अष्टपैलू खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर ठेवीन, ज्याला अनेक संघ खरेदी करू इच्छितात. सुंदरला पुन्हा एकदा 8 किंवा 9 कोटी रुपये मिळू शकतात.”

आकाश चोप्राने 3 सर्वात महागड्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये 2 ऑस्ट्रेलियन आणि एका इंग्लिश खेळाडूची निवड केली आहे. चोप्राने मॅक्सवेलला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे कारण या फॉरमॅटमध्ये त्याचे नाव खूप मोठे आहे. मात्र, चोप्राने यादरम्यान मॅक्सवेलची अलीकडची कामगिरी तितकीशी प्रभावी ठरली नसल्याचे वक्तव्य देखील केले आहे.

पुढे बोलताना आकाश चौप्रा म्हणाला, “आरसीबी त्यांचे आरटीएम कार्ड विल जॅकसाठी वापरू शकते. इतर अनेक संघही त्याच्या मागे जातील कारण त्याने गेल्या हंगामात शतक झळकावले होते. मी मार्कस स्टॉयनिसला पहिल्या क्रमांकावर ठेवीन. तो लिलावात सर्वात महाग अष्टपैलू खेळाडू का असेल? मुख्य कारण म्हणजे त्याची आकडेवारी आयपीएलमध्ये चांगली राहिली आहे आणि तो या फॉरमॅटमध्ये एक मजबूत खेळाडू आहे.”

2025च्या आयपीएल हंगामासाठी मेगा लिलाव (IPL Mega Auction) होणार आहे. त्यासाठी आयपीएल लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबिया, जेद्दाह येथे होणार आहे. 2022च्या आयपीएल हंगामानंतर हा पहिला मेगा लिलाव आहे. यंदाच्या मेगा लिलावात 574 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये 366 भारतीय आणि 208 विदेशी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताने तिसऱ्यांदा पटकावले चॅम्पियन्स ट्राॅफीचे विजेतेपद! फायनलमध्ये चीनचा उडवला धुव्वा
“असा कोणीही नाही ज्याची…” रोहित शर्माबद्दल माझी भारतीय क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य!
अलविदा नदाल…! 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन त्याच्या शेवटच्या सामन्यात घरच्या चाहत्यांसमोर हरला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---