चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून(५ फेब्रुवारी) सुरु झाला आहे. एमएस चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात १८० षटकांत ८ बाद ५५५ धावा केल्या आहेत. एकीकडे इंग्लंडचा कर्णधार जो रूटने आपले शानदार द्विशतक ठोकले तर दुसरीकडे डोम सिब्ली (८७) आणि बेन स्टोक्स (८२) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. त्यामुळे इंग्लडला चांगली धावसंख्या उभारण्यात यश आले.
मात्र, भारताच्या गोलंदाजांना आपला खास ठसा चेन्नईच्या या खेळपट्टीवर उमटविता आला नाही. भारतीय खेळपट्टीवर चेंडूवर लाळ लावू शकत नसल्यामुळे गोलंदाजी करण्यास अडचण येत आहे. याचा फायदा फलंदाजांना होत आहे, असे मत जसप्रीत बुमराहने व्यक्त केले होते.
चेन्नईच्या या खेळपट्टीची परिस्थिती पाहता या कसोटी सामन्यात माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने सामन्याच्या पहिल्या दिवशी चार भविष्यवाण्या केल्या होत्या. भारतीय संघाचा चेतेश्वर पुजारा याच्याबद्दल त्याने खास भविष्यवाणी केली आहे. त्याचा मते चेन्नईच्या खेळपट्टीवर नजर टाकल्यास भारतीय खेळाडू आपली कामगिरी उत्तम बजावून चेतेश्वर पुजारा शतक झळकावेल.
https://twitter.com/cricketaakash/status/1357676710611755008
या आहेत आकाश चोप्रा याच्या भविष्यवाण्या
पहिली भविष्यवाणी
आकाश चोप्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात त्याने म्हटले आहे की भारताची सलामीची भागीदारी ५० पेक्षा जास्त धावांची होऊन शुभनम गिल आणि रोहित शर्मा चांगली फलंदाजी करतील.
दुसरी भविष्यवाणी
विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा दोघेही आपल्या पहिल्या डावात ५० पेक्षा अधिक धावसंख्या उभारतील
तिसरी भविष्यवाणी
बेन स्टोक्स आणि चेतेश्वर पुजारा यांच्यातील एक जण शतक झळकावेल. असे असले तरी चोप्राची ही भविष्यवाणी अर्धीतक चूकीची ठरली आहे. कारण स्टोक्स ८२ धावांवर बाद झाला.
चौथी भविष्यवाणी
श्रीलंका दौऱ्यावर शानदार कामगिरी करणारा फिरकीपटू डोम बेस पाचपेक्षा अधिक बळी घेईल. बेस भारतात प्रथम खेळत असून सध्या तो फॉर्ममध्ये असल्याने आकाश चोप्राने ही भविष्यवाणी केली.
आकाश चोप्राच्या ह्या भविष्यवाण्या किती खऱ्या ठरताहेत हे पाहणे औसुक्याचे ठरणार असून चेतेश्वर पुजाराच्या खेळीबाबत त्याचा विश्वास हा किती फळाला जाईल हे देखील आगामी सामन्यात पाहता येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
पाच वर्षांनी दिले फ्लिंटॉफने अमिताभ बच्चन यांना उत्तर, ‘हा’ होता प्रश्न
रोहित विराटचा ‘मुंबई लोकल’ मिम तुफान व्हायरल, चाहत्यांची मिळतेय पसंती
दोन वर्षांपूर्वी ‘सांगली एक्सप्रेस’ स्म्रीती मंधनाने केला होता ‘तो’ खास पराक्रम






