भारतात यावर्षी एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. हा आयसीसी वनडे विश्वचषक 5 ऑक्टोंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या विश्वचषकासाठी जागभरातील क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. या उत्सुकतेत भर घालण्यासाठी भारताचा संघाचा माजी कसोटी फलंदाज आकाश चोप्रा याने एक भविष्यवाणी केली आहे. आकाश चोप्राच्या मते “भारतीय संघासोबत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे चार संघ विश्वचषक 2023च्या उपांत्य फेरीत पोहचतील. भारत संघ हा विश्वविजेता होण्याचा प्रबळ दावेदार आहे.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) म्हणतो की, “बीसीसीआय खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. कोणत्याही प्रकारचा वर्ल्डकप असला तरी बीसीसीआय त्याची पुर्व तयारी करून घेत असतात. या दरम्यान तुम्ही तुमच्या संघात कोणतेही बदल करू शकता. संघातील डावे-उजवे समीकरण असेल, फलंदाज कोणत्या क्रमांकावर खेळणार याच्यात फेरबदल करने. असे अनेक प्रयोग करून आपला संघ तयार करण्यास बीसीसीआय मदत करते. भारतीय संघातील खेळाडूंने एकत्रितपणे मिळून याची तयारी केली पाहीजे.”
पुढे तो म्हणाला, “भारतीय संघातील खेळाडूंने एकसोबत आणि सतत खेळले पाहिजे. जेने करून खेळाडूंना वेगवेगळ्या परस्थितीत खेळण्याचा अनुभव प्राप्त होईल. संघ कधी 25 धावांवर 3 विकेट्सवर गमवेल तर कधी 210 धावांवर 1 विकेट गमवेल या परिस्थितीचा अनुभव तुम्हाला मिळाला पाहीजे. काही खेळाडू खेळत असतात तर काही खेळाडूंना विश्रांती दिली जाते. असे झाल्यास विश्वचषकासाठी तुम्हची तयारी कमी पडेल.” (aakash-chopra-predicts-the-top-four-of-the-world-cup)
विश्वचषकात भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान सोबत होणार आहे. हा सामना 15 ऑक्टोंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता. परंतु आता यात फेरबदल करणार असल्याची माहीती समोर येत आहे. 15 ऑक्टोंबर या दरम्यान नवरात्र चालू होणार असल्याने हा फेरबदल करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
बुमराहच्या फिटनेसवर विश्वविजेत्या कर्णधाराने उपस्थित केला गंभीर प्रश्न! आयपीएलबाबत काय म्हणाले वाचाच
ASHES 2023 । चौथ्या दिवसाखेर इंग्लिश चाहत्याचा ख्वाजाशी पंगा! लॅबुशेननं मागे वळून काय केलं पाहाच