आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव १२ व १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे होणार आहे. ज्या लिलावासाठी तब्बल १२०० भारतीय व विदेशी खेळाडूंनी नाव नोंदणी केली असून, १० संघ खेळाडूंवर बोली लावताना दिसतील. या लिलावात कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळणार याबाबत चाहते अंदाज व्यक्त करत आहेत. भारताचे माजी सलामीवीर व प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना या लिलावात कोणत्या भारतीय गोलंदाजांवर सर्वाधिक पैसे लावले जातील याबाबत आपले मत व्यक्त केले.
काय म्हणाले आकाश चोप्रा
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा यांनी पुढील ईलाबाद कोणत्या भारतीय वेगवान गोलंदाज आवर सर्वाधिक बोली लावली जाईल याबाबत आपला अंदाज व्यक्त केला. ते म्हणाले,
“मला वाटते की आगामी आयपीएल लिलावात दीपक चहर हा सर्वात महागडा भारतीय वेगवान गोलंदाज असेल. दीपक नवीन चेंडूने विकेट घेण्यात माहीर आहे. त्याच्याशिवाय हे काम सतत करण्याची क्षमता इतर कोणत्याही भारतीय खेळाडूत मला दिसत नाही. पहिल्या तीन षटकांमध्ये दीपक तुमच्यासाठी बँकेसारखा आहे. पॉवरप्लेमध्ये तो तुम्हाला विकेट मिळवून देतो.”
आकाश चोप्रा पुढे म्हणाले की,
“चहरला मी अप्रतिम डेथ ओव्हर गोलंदाज म्हणणार नाही. मात्र, त्याचा वापर केला जाऊ शकतो. मला वाटते की चेन्नई सुपर किंग्स दीपक चहरला पुन्हा विकत घेण्याचा प्रयत्न करेल. अहमदाबाद आणि लखनऊ देखील तशाच प्रयत्नात असतील. त्यामुळे दीपक चहर चांगलाच महागडा ठरू शकतो. तो आता शानदार फलंदाजीही करतो.”
चहर मागील चार हंगामात पासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता. मात्र चेन्नईने त्याला आगामी हंगामासाठी रिटेन केले नाही.
अशी आहे टी२० कारकीर्द
दीपक चहरने ११५ टी२० सामन्यांमध्ये १३१ विकेट घेतल्या आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेट सुद्धा ७.६१ असा कमी राहिला आहे. चहरने टी२० मध्ये दोनदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये दीपक चहरने ६३ सामन्यात ५९ विकेट घेतल्या आहेत. चहरने २०१६ मध्ये आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. पुणे सुपरजायंट्सने २०१७ पर्यंत दीपक चहरला आपल्या संघात ठेवले होते. यानंतर चहर चेन्नईकडून खेळला आणि २०१८ व २०२१ मध्ये तो आयपीएल चॅम्पियन संघाचाही भाग बनला.
महत्वाच्या बातम्या-