भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याने काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. काही दिवसांपूर्वीच तो पिता झाल्यामुळे चर्चेत आला होता. दरम्यान आता त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर चाहते देखील मजेशीर प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.(Yuvraj Singh viral video)
सोशल मीडियावर दररोज काही ना काही ट्रेंडींग सुरू असतं. सामान्य नागरिकांसह बॉलीवूड मंडळी आणि क्रिकेटपटू देखील ट्रेंड फॉलो करत असतात. नुकताच युवराज सिंगने देखील एक मजेशीर ट्रेंड फॉलो केला आहे. ज्याचा व्हिडिओ त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये त्याचा चेहरा विचित्र दिसून येत आहे. त्याच्या चेहरा विचित्र होण्यामागचे कारण असे की, त्याने इंस्टाग्रामच्या एका फिल्टरचा वापर केला आहे. त्याचा विचित्र अवतार पाहून चाहते देखील गोंधळून गेले आहेत. तो या व्हिडिओमध्ये “किन्ना सोना तुझे रबने बनाया” हे गाणं गाताना दिसून येत आहे. परंतु, तो शेवटी स्वतः म्हणतो की, ” चल जा इधर से गंदि शकल वाले.” त्यानंतर तो जोरजोरात हसू लागतो.
या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) देखील या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एका चाहत्याने प्रतिक्रीया देत म्हटले आहे की, ” हा आवाज तर ईशांत शर्मा सारखा वाटतोय.” तसेच आणखी एका चाहत्याने लिहिले की, ” आयुष्यात पहिल्यांदाच चांगला दिसतोय.”
तसेच काही दिवसांपूर्वीच हेजल कीच आणि युवराज सिंगच्या आयुष्यात मुलाचे आगमन झाले होते. ही बातमी त्यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली होती.
महत्वाच्या बातम्या
वयाच्या ४१ व्या वर्षी केविन पीटरसनची मन जिंकणारी फिल्डींग पाहिली का? बघा व्हिडिओ
हे नक्की पाहा: