लिजेंड्स लीग क्रिकेट २०२२ स्पर्धा (Legends cricket league 2022) ओमानमध्ये यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडू आपल्या खेळाचे प्रदर्शन करताना दिसून आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आशिया लायन्स (Asia lions) आणि वर्ल्ड जायंट्स (world giants) हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या सामन्यात वर्ल्ड जायंट्स संघाने २५ धावांनी विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले. दरम्यान, या सामन्यात केविन पीटरसनने (Kevin Pietersen) आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा उत्तम असा नमुना दाखवला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
केविन पीटरसन क्रिकेट खेळत असताना सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक होता. आता क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर वयाच्या ४१ व्या वर्षी देखील त्याने उत्तम क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला आहे. त्याने सीमारेषेवर झेल टिपत असताना असे काही केले ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. (Kevin Pietersen fielding video)
तर झाले असे की, आशिया लायन्स संघाची फलंदाजी सुरू असताना वर्ल्ड जायंट्स संघाकडून १२ वे षटक टाकण्यासाठी एल्बी मॉर्कल गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर असगर अफगाणने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने लाँग ऑफच्या वरून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी केविन पीटरसन लाँग ऑफला क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू त्याच्यावरून ६ धावांसाठी जाणार इतक्यात त्याने हाताने पुढे ढकलला आणि हवेत उडवत स्वतः सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला. त्यावेळी डॅरीन सॅमीने हा झेल टिपला आणि फलंदाज बाद होऊन माघारी परतला. केविन पीटरसनने केलेल्या या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे चहू बाजूने कौतुक होत आहे.
https://twitter.com/SportsHustle3/status/1487492266302504961
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, वर्ल्ड जायंट्स संघाकडून कोरी अँडरसनने सर्वाधिक ९४ धावांची खेळी केली. तर केविन पीटरसनने ४८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर वर्ल्ड जायंट्स संघाला २० षटक अखेर २५६ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना आशिया लायन्स संघाकडून मोहम्मद युसुफने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. तर सनाथ जयसुर्याने ३८ धावांचे योगदान दिले होते. आशिया लायन्स संघाला या सामन्यात २० षटक अखेर ८ बाद २३१ धावा करण्यात यश आले होते. हा सामना वर्ल्ड जायंट्स संघाने २५ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
कडक ना!! वेगवान चेंडूवर फलंदाज बाद होताच भारतीय गोलंदाजाचे रोनाल्डो स्टाईल सेलिब्रेशन, व्हिडिओ पाहा
हे नक्की पाहा :






