भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत संघासाठी किफायतशीर ठरला. वनडे मालिकेती शेवटच्या सामन्यात त्याने 4, तर संपूर्ण मालिकेत 8 विकेट्स घेतल्या. मागच्या दोन वर्षांपासून त्याला भारताच्या वनडे संघात नियमित स्थान मिळत आले आहे. याच पार्श्वभूमीवर शार्दुलचे आगामी विश्वचषकात भारतीय संघातील स्थान निश्चित झाल्याचे मानले जात आहे. याच मुद्द्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने आपले मत व्यक्त केले आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज (Shardul Thakur) यांच्यातील तिसरा वनडे सामना पाहुण्या भारतीय संघाने 200 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने मालिका देखील 2-1 अशा अंतराने नावावर केली. शेवटच्या सामन्यात शार्दुलने 6.3 षटकात 37 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. हे त्याचे सर्वोत्तम वनडे प्रदर्शन ठरले.
त्याच्या या कामगिरीनंतर बोलताना चोप्रा म्हणाला,
“मला वाटते की शार्दुल ठाकूर याची विश्वचषकासाठी संघातील जागा निश्चित झाली आहे. तो इतर गोलंदाजांच्या तुलनेत फार पुढे गेला असून तो नक्कीच विश्वचषकात खेळताना दिसेल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांच्यासह तो भारतीय वेगवान गोलंदाजीचे प्रतिनिधित्व करेल. 2019 विश्वचषानंतर त्याने भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे.”
तिसऱ्या सामन्यानंतर बोलताना स्वतः शार्दुल याने मात्र विश्वचषकासाठी आपली संघात निवड होणे अथवा न होणे आपल्या हातात नसल्याचे म्हटलेले. निवड झाली तरी आणि नाही झाली तरी मी तीच मेहनत करत भारतीय संघाच्या विजयात योगदान देण्याचा प्रयत्न करेल असे त्याने म्हटलेले.
(Aakash Chopra Said Shardul Thakur Will Our Fourth Bowler In 2023 ODI World Cup)
महत्त्वाच्या बातम्या-
देवधर ट्रॉफीत रियान पराग नावाचं वादळ! 259 धावा चोपत घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स
बिग ब्रेकिंग! क्रीडा मंत्री झालेल्या भारतीय खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती