भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील कमी धावसंख्येचा पहिला वनडे सामना भारताच्या नावावर ठरला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना वादळी फलंदाजी करण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे यजमान संघाचा डाव 114 धावांवरच संपुष्टात आला. हे आव्हान भारतीय संघाने सहजरीत्या पार करत सामना खिशात घातला. मात्र, सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा याचा संताप पाहायला मिळाला. त्याने शार्दुल ठाकूर याच्यावर आगपाखड केली. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
रोहितचा संताप
झाले असे की, वेस्ट इंडिज संघाच्या डावातील 19वे षटक कुलदीप यादव टाकत होता. यावेळी अखेरच्या चेंडूवर यजमान संघाचा कर्णधार शाय होप (Shai Hope) स्ट्राईकवर होता. यावेळी कुलदीपच्या चेंडूवर होपने फटका मारला. यावेळी मिड ऑफवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या शार्दुल ठाकूर याच्याकडून चूक झाली आणि होपला अतिरिक्त धाव घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे रोहित शार्दुलवर संतापला. यावेळी त्याने शार्दुलला खराब क्षेत्ररक्षण केल्याप्रकरणी चांगलेच सुनावले. आता या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
https://twitter.com/FoaxCricket/status/1684586686980976641?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1684586686980976641%7Ctwgr%5Eab65f44fb1deef5959e1b36f0f43119d99abd563%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fcricket%2Fbouncer-skipper-rohit-sharma-lashed-out-at-shardul-thakur-due-to-lazy-fielding-in-ist-odi-against-wi-23484611.html
कुलदीप- जडेजा जोडीची कमाल
शाय होप या सामन्यात 43 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघ 114 धावांपर्यंत मजल मारू शकला. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना फिरकीपटूंनी मैदान मारले. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने 3 षटके गोलंदाजी करताना 2 षटके निर्धाव टाकत आणि 6 धावा खर्च सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यानेही 3 विकेट्स नावावर केल्या. अशाप्रकारे या फिरकी जोडीने 7 विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनीही प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
भारतीय संघ मालिकेत आघाडीवर
वेस्ट इंडिजच्या 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. यावेळी भारताकडून ईशान किशन याने चमकदार कामगिरी केली. त्याने 46 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यात 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. (captain rohit sharma lashed out at shardul thakur due to lazy fielding in ist odi against wi)
महत्त्वाच्या बातम्या-
बॅटिंग न करताही विराटने लुटली मैफील, एका हाताने कॅच पकडत फलंदाजाला दाखवला तंबूचा रस्ता- व्हिडिओ
IND vs WI : रोहित सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का उतरला? सामन्यानंतर डिटेलमध्ये सांगितलं कारण