---Advertisement---

हे १० युवा खेळाडू येत्या काळात क्रिकेटवर अक्षरशः राज्य करतील, तीन आहेत भारतीय

On: गुरूवार, जून 25, 2020 5:09 PM
---Advertisement---

मुंबई । टाळेबंदीच्या काळात क्रिकेट सामने होत नसल्याने अनेक खेळाडू सोशल मीडियावर आपला वेळ घालवत आहेत तर काही आजी माजी खेळाडू आपला सर्वोत्तम संघ निवडण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने नुकतेच जगभरातील दहा युवा खेळाडूंची यादी केली आहे. आकाश चोप्राच्या मते, निवडण्यात आलेले दहा खेळाडू हे जागतिक क्रिकेटमध्ये धमाल करतील.

निवडलेल्या या दहा खेळाडूंमध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, ज्यात पृथ्वी शॉ, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या खेळाडूंना निवडले. यापैकी पृथ्वी शॉ  आणि शुभमन गिल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वीच पदार्पण केले आहे यशस्वी जैस्वाल याने 19 वर्षाखालील विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती.

आकाश चोप्रा याने निवडलेल्या खेळाडूंच्या यादीत शुभमन गिल यांचे नाव पहिले आहे. आकाश म्हणाला, ” शुभमन गिल मध्ये खूप ‘टॅलेंट’ भरले आहे. तो आक्रमक खेळून धावा करतो. तो असा फलंदाज आहे जो की क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात फिट बसतो. येणाऱ्या काही दिवसात त्याचे आक्रमक फटके पाहायला मिळतील. जयस्वाल यांनी कमी वयातच आपल्या खेळीने प्रभावित केले आहे. मागील विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याला जर संधी मिळाली तर त्याचे भविष्य उज्ज्वल होईल.”

आकाश चोप्रा पृथ्वी शॉच्या बाबतीत बोलताना म्हणाला,  “न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने खुपच चांगला खेळ दाखवला. त्याच्यामध्ये धावांची भूक आहे. येणारे दहा वर्षे त्याचेच आहेत.”

आकाश चोप्राने या यादीत पाकिस्तानच्या तीन खेळाडूंचा समावेश केला आहे. यात दोन गोलंदाज निवडले आहेत. तो म्हणाला, ” शाहीन आफ्रिदी आणि नसीम शहा यांच्या गोलंदाजीवर पाकिस्तानला अभिमान असेल. उजव्या हाताने गोलंदाजी करणार्‍या शाहीनला त्याच्या उंचीचा सर्वाधिक उपयोग होतो. तो फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. त्यांचेही भविष्य उज्ज्वल आहे. हे नाव अनेकदा यापुढे ऐकता येईल. हैदर अली पुढील काळात बाबर आझम सारखा क्रिकेट खेळताना दिसून येईल. त्याने पाकिस्तान सुपर लीग आणि क्वैड-ए-आजम ट्रॉफीमध्ये दमदार प्रदर्शन केले.”

आकाश चोप्राने निवडलेले 10 युवा खेळाडू :

शुबमन गिल (भारत), शाहीन अफरीदी (पाकिस्तान), टॉम बँटन (इंग्लैंड), नूर अहमद (अफगानिस्तान), जोश फिलिप (ऑस्ट्रेलिया), यशस्वी जायसवाल (भारत), जेराल्ड कोएल्जी (दक्षिण अफ्रीका), नसीम शाह (पाकिस्तान), पृथ्वी शॉ (भारत), हैदर अली (पाकिस्तान)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---