भारत हा क्रिकेटवेड्या लोकांचा देश आहे. इथे मोठ्या इमारतीत राहणाऱ्या श्रीमंतापासून ते गल्ली-बोळात रहाणाऱ्या गरीबांपर्यंत सर्वांच्या नसानसात क्रिकेट भिनलेले असते. लहान मुले तर अगदी प्लॅस्टिकची बॅट आणि बॉल घेऊन आपल्या मोठ्या भावांबरोबर क्रिकेट खेळायला निघतात. अगदी नोकरी करणारी मोठी माणसेही सुट्टी मिळाली, तर मित्रपरिवाला एकत्र करुन क्रिकेटचा डाव मांडतात. असाच एका क्रिकेटवेड्या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पुढे आला आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो अज्ञात चिमुकला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूप्रमाणे ग्लव्हज, पॅड, शूज घालून पूर्ण तयारीने फलंदाजी करताना दिसत आहे. दिसायला ७-८ वर्षांचा दिसणारा हा चिमुकला एका प्रतिभाशाली क्रिकेटपटूसारखा मैदानाच्या चारी दिशांना शॉट मारताना दिसत आहे.
या चिमुकल्याच्या फलंदाजीचे समालोचन आकाश चोप्रा यांनी केले आहे. त्यांनी चिमुकल्याच्या फलंदाजीने प्रभावित होऊन त्याची फलंदाजी शैली अगदी न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज केन विलियम्सनसारखी आहे, असे म्हटले आहे.
चोप्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “लायसन्स भलेही नाही मिळाले, पण गाडी भारी चालवतोय हा चॅम्पियन.” सोबतच त्यांनी हसतानाचे, दोन हात जोडून सलाम करतानाचे इमोजी टाकले आहेत.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने असे लहान प्रतिभावंत मुलांचे व्हिडिओ शेअर करण्यासाठी चोप्राचे आभार मानले आहेत. काहींना त्या चिमुकल्याची फलंदाजी सचिन तेंडूलकर, माहेला जयवर्धने यांच्यासारखी भासली आहे.
License bhale na mile par Driving durust hai champion ki 😇👏😊 #AakashVani pic.twitter.com/tl72fzDxhB
— Aakash Chopra (@cricketaakash) January 9, 2021
आकाश सर आपका बहुत-बहुत शुक्रिया कि आप इस तरह के वीडियो को लाते हो जिसमें इतने छोटे-छोटे बच्चे बहुत सुंदर Cover Drive करते हुए दिखते हैं
— Sandip Thakur (@SandipT30517836) January 9, 2021
https://twitter.com/Real_Divyansh/status/1347758790469324802?s=20
Stance is like Mahela Jayawardane..
— CA Prakash Padalia (@pakuuuman) January 9, 2021
https://twitter.com/Raja__Rabish/status/1347761419857522688?s=20
Tagda ballebaaj hai 😁
— avinash pradhan (@avinashpradha19) January 9, 2021
https://twitter.com/igljibran/status/1347758836061528065?s=20
Excellent 👌
— Bilal Mazhar 🇵🇰🇵🇸 (@bilalmazhar_10) January 9, 2021
आकाश चोप्रा हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सतत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अकाउंटवर ते वेगवेगळ्या गुणवंत मुलांचे क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओ शेअर करतात आणि सर्वांना त्यांची प्रतिभा दाखवतात. अशाप्रकारे नकळत चोप्रा हे मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.
महत्त्वाच्या बातम्या-
IND v AUS Live : सिराजची फायरिंग सुरूच! ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावात सलामीची जोडी फोडली
अरे पळा पळा…! टीम इंडियाचे ‘हे’ 3 पठ्ठे असे झाले रनआऊट, व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल
AUS vs IND : रिषभ पंतनंतर टीम इंडियाला आणखीन एक धक्का, जडेजा मैदानाबाहेर