भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा सोशल मिडीयावर ‘आकाशवाणी’ या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्रिकेट सामन्यांचे विश्लेषण तो करत असतो. त्याचप्रमाणे स्थानिक क्रिकेटमधील गुणवान खेळाडूंचे व्हिडिओ देखील तो आपल्या चॅनलवर शेअर करत असतो. असाच एक हटके व्हिडिओ त्याने नुकताच शेअर केला आहे.
या व्हिडिओत एक मुलगा आश्चर्यकारक गोष्ट करत असताना दिसतो आहे. टेनिस बाॅलवर फलंदाजी करत असलेल्या या खेळाडूने चक्क एका हाताने हेलिकॉप्टर शॉट मारला आहे. यामागे आकाश चोप्रा समालोचन देखील करत आहे. “दोन हातांनी शॉट मारण्यात या खेळाडूचा विश्वास नाही. षटकार मारण्याची या खेळाडूची इच्छा दिसते आहे…आणि चक्क एका हाताने या खेळाडूने षटकार मारला देखील…”, अशा शब्दात आकाश चोप्राने या फटक्याचे वर्णन केले आहे. तसेच ‘तुम्ही एका हाताने हेलिकॉप्टर उडवू शकता का?’ असे गमतीशीर कॅप्शनही या व्हिडिओला त्याने दिले आहे.
पाहा व्हिडिओ:
Can you fly a helicopter with one hand? 🚁#AakashVani #Cricket pic.twitter.com/8f5wzNL4Kg
— Aakash Chopra (@cricketaakash) December 25, 2020
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळण्याची सुरुवात भारताचा माजी फलंदाज एमएस धोनीने केली होती. धोनी स्वतः हा शॉट टेनिस बाॅल क्रिकेट खेळत असताना आपल्या मित्राकडून शिकल्याचे सांगतो. मात्र धोनीमुळे या शॉटला खरी लोकप्रियता मिळाली. अनेक फलंदाजांनी या शॉटचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या हंगामात स्फोटक फलंदाज हार्दिक पंड्या हा शॉट अनकेदा खेळत असल्याचे दिसून आले.
हेलिकॉप्टर शॉट हमखास सहा धावा देऊन जात असला तरी खेळण्यास मात्र हा शॉट अतिशय अवघड आहे. खोल टप्प्याच्या चेंडूवर मिडविकेट किंवा लॉंग आॅनच्या दिशेने हा शॉट खेळताना ताकदी बरोबरच अचूक टायमिंग साधणेही आवश्यक असते. धोनीने अनकेदा या फटक्याने धावा वसूल केल्याने त्याचे अनुकरण करणारे युवा फलंदाजही नेहमीच हा शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असतात.
महत्वाच्या बातम्या:
– तो काहीही करू शकतो, बॉक्सिंग डे कसोटीत खेळण्याआधीच पंतचा ऑसी कर्णधाराने घेतला धसका
– बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, हे दोन खेळाडू करणार पदार्पण
– कांगारूंच्या या गोष्टीची आम्ही पर्वा करत नाही; दुसर्या कसोटीपूर्वी अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया