अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ शनिवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्न येथे ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच भारतीय संघाने या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. या संघात चार प्रमुख बदल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे, यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाच्या जागी रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने चांगलीच धसकी घेतली आहे.
पंतव्यतिरिक्त युवा क्रिकेटपटू शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळाली आहे. त्यामुळे ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यातून गिल आणि सिराज कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करतील.
पंत आमच्या समस्या वाढवू शकतो- टीम पेन
उजव्या हाताचा फलंदाज टीम पेन म्हणाला की, “आम्हाला सर्वांना माहिती आहे की पंत एक खतरनाक खेळाडू आहे. आम्हाला माहिती आहे की, तो काय करू शकतो. तो सकारात्मक क्रिकेट खेळण्यावर विश्वास ठेवतो. जर आम्ही त्याला छोटीशी संधी दिली, तर तो आमच्या समस्या वाढवू शकतो. त्यामुळे आम्ही ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यातही ऍडलेड कसोटी सामन्यातील आमच्या दमदार प्रदर्शनाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करणार आहोत.”
भारतीय खेळाडूंचा केलाय पूर्ण होमवर्क- टीम पेन
भारतीय संघातील खेळाडूंविषयी बोलताना टीम पेन म्हणाला की, “कसोटी मालिकेची सुरुवात होण्यापुर्वीच आम्ही भारतीय संघातील सर्व खेळाडूंचा अभ्यास केला आहे. त्यांची कमजोरी काय आहे? त्यांची ताकद काय आहे? भारतीय फलंदाजांना लवकर बाद करण्यासाठी खेळपट्टीवरील कोणत्या भागात चेंडू टाकावा? अशा सर्व गोष्टींची आम्ही तयारी करून ठेवली आहे. आम्ही विजय मिळवण्यासाठी जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
भारतीय संघाला पिछाडीवर टाकण्याच्या प्रयत्नात- टीम पेन
“पहिल्या कसोटी सामन्यात आम्ही ज्या आत्मविश्वासाने प्रदर्शन केले. त्याच आत्मविश्वासाने ‘बॉक्सिंग डे’ कसोटीतही खेळणे किती महत्त्वाचे आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे आम्ही ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारतीय संघाला पिछाडीवर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरुन तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्याची लढत खूप रोमांचक होईल,” असे शेवटी बोलताना टीम पेनने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हे’ दोन खेळाडू करणार पदार्पण
अनुभव कर्णधारपदाचा! अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कशी राहिली भारतीय संघाची कामगिरी, पाहा
…आणि चेतन शर्मा यांच्यावर आली होती तोंड लपवून फिरण्याची वेळ, जाणून घ्या पूर्ण प्रकरण






