माजी भारतीय सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने आयपीएलच्या सनराइजर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरविषयी मोठे विधान केले आहे. वॉर्नर या आयपीएल हंगामात क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दाखवून देईल की, तो एक दमदार कर्णधार आहे आणि ऑस्ट्रेलियाने त्याच्या कर्णधारपदावर बंदी घालून खूप चुकीचे केले आहे, असे चोप्राने म्हटले. Aakash Chopra Statement About David Warner
२०१८ मध्ये चेंडू छेडछाड प्रकरणामुळे वॉर्नरवर एक वर्षांची क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच त्यावेळी त्याच्यावर आजीवर कर्णधारपद सांभाळण्यावरही बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे वॉर्नर कधीही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होऊ शकत नाही.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना चोप्रा म्हणाला की, “वॉर्नर हा आयपीएलच्या सनराइजर्स हैद्राबाद संघाचा टूर्नामेंट संरक्षक आहे. गतवर्षीचा आयपीएल हंगाम सुरु होण्यापुर्वी वॉर्नरने म्हटले होते की, तो पूर्ण हंगामात ५०० धावा करेल आणि त्याने त्यापेक्षा जास्त धावा केल्या होत्या. वॉर्नर हा आयपीएलच्या सार्वकालिन महान खेळाडूंपैकी एक आहे. कारण, एवढ्या दमदार स्ट्राईक रेटसह सलग धावा करणे सोपी गोष्ट नसते.”
चोप्रानुसार वॉर्नर जेव्हा टी२० क्रिकेटमध्ये खेळतो, तेव्हा त्याला फिरकी गोलंदाजीचा सामना करायला अजिबात अडचण येत नाही. तसेच तो वेगवान गोलंदाजांविरुद्धही खूप धावा करतो. तो पहिल्या ६ षटकांचा फायदा घेत मोठी खेळी करतो.
तसेच, पुढे वॉर्नरच्या नेतृत्त्वाविषयी बोलताना चोप्रा म्हणाला की, “वॉर्नर हा सध्या हैद्राबाद संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याच्यावर खूप जबाबदाऱ्या असणार. तो नक्की स्वत:ला सिद्ध करून दाखवेल. चेंडू छेडछाड प्रकरणानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्णय घेतला होता की, त्याला पुन्हा कर्णधार बनवायचे नाही. परंतु, आयपीएलमध्ये हैद्राबाद संघाचे दमदार नेतृत्त्व करत तो क्रिकेट ऑस्ट्रेलियाला चुकीचे सिद्ध करेल.”
आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. वॉर्नरच्या नेतृत्त्वाखालील सनराइजर्स हैद्राबाद संघ २१ सप्टेंबर रोजी पहिल्यांदा मैदानावर उतरेल. त्या दिवशी त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियासाठी आनंदाची बातमी; हा स्टार खेळाडू खेळणार दुसऱ्या वनडे सामन्यात
विराट कोहली हा तर बिघडलेला क्रिकेटपटू, आता सुधारलाय; पहा कोण म्हणतंय
हरभजन सिंगचे खळबळजनक ट्विट; क्रिकेट जगताचे लागले लक्ष
ट्रेंडिंग लेख –
दुसऱ्या काळात जन्न्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता
हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार
इरफानला एकाच ओव्हरमध्ये २४धावा कुटणारा ‘ज्युनियर सेहवाग’ आयपीएल गाजवायला सज्ज