प्रथमत आयोजित झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गडी राखून पराभव करत, विश्वविजेते होण्याचा मान मिळवला. न्यूझीलंड संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर सहाव्या राखीव दिवसापर्यंत गेलेल्या या सामन्यात अखेरच्या सत्रात विजय मिळविण्याची कामगिरी केली. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करू शकला नाही. मात्र, कोहली दुसऱ्या डावात समालोचक आकाश चोप्रा यांच्यामुळे बाद झाल्याचे काही चाहते म्हणत आहेत.
विराट बनला जेमिसनची शिकार
या ऐतिहासिक अंतिम सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाने २ बाद ६४ धावसंख्येवरून आपला दुसरा डाव सुरू केला. भारतीय कर्णधार व चेतेश्वर पुजारा हे मैदानात उतरले व त्यांनी भारताचा डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. मात्र, भारतीय डावाच्या ३६ व्या षटकात विराट कायले जेमिसनच्या एका उत्कृष्ट आउट स्विंग चेंडूवर यष्टीरक्षक बीजे वॉटलींगकडे झेल देत वैयक्तिक १५ धावांवर माघारी परतला. विराटला पहिल्या डावात देखील जेमिसनने ४४ धावांवर पायचीत पकडले होते.
आकाश चोप्रा यांची काळी जीभ
विराटच्या चेंडूवर बाद झाला त्या चेंडूच्या अगदी काही सेकंदपूर्वी टीव्हीवर समालोचन करणारे आकाश चोप्रा हे भारताच्या फलंदाजी क्रमाबद्दल बोलत होते. विराट बाद झालेल्या चेंडूपूर्वी टीव्हीवर ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या अजिंक्य रहाणेचा चेहरा दाखवण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना चोप्रा म्हणाले, “अजिंक्य रहाणे पुढील फलंदाज आहे. आता इतक्यात कोणी बाद झाले तर, रिषभ पंत देखील फलंदाजीला येऊ शकतो.”
चोप्रा यांनी असे म्हणताच विराट बाद झाला. त्यांच्या या समालोचनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांनी चोप्रा यांना काळ्या जीभेचा म्हणून हिणवले आहे.
@cricketaakash this is again you did it with your black tongue 🤐 😠#INDvsNZ @DisneyPlusHS #WTC2021Final #WTCFinals pic.twitter.com/cQ6cuzNViU
— Mortis (@Ego_mortis) June 23, 2021
आपल्या सोप्या भाषेतील मात्र काहीश्या अतिउत्साही समालोचनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आकाश चोप्रा यांचा विशेष चाहता वर्ग आहे. हिंदी समालोचनातील ते एक उत्कृष्ट समालोचक मानले जातात. आकाश चोप्रा यांनी भारतीय क्रिकेट संघाचे १० कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले होते. भारतीय संघाने २००३-२००४ मध्ये पाकिस्तानात मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात त्यांचा खारीचा वाटा होता.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताला पराभूत केल्यानंतरही न्यूझीलंडने जिंकली मनं, ‘या’ शब्दात मानले आभार
‘तुम्ही यासाठी पात्र होता’, न्यूझीलंडच्या विजयानंतर रवी शास्त्री यांनी दाखवली खिलाडूवृत्ती
आयपीएल 2021 बाबत चाहत्यांसाठी आली एक आनंदाची बातमी, ‘या क्रिकेट बोर्डांनी खेळाडूंना दिली परवानगी