डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सुरु होणारा भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) सातत्याने चर्चेत आहे. आधी ओमिक्रोन विषाणू त्यानंतर कर्णधारपदाचा या गोष्टी घडत आहेत. त्याच वेळी आता भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Test Vice Captain Rohit Sharma) दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी गुजरातचा सलामीवीर प्रियांक पांचाल (Priyank Panchal) याची संघात निवड केली गेली. मात्र, या निवडीवर आता माझी भारतीय क्रिकेटपटूने आक्षेप नोंदवला आहे.
रोहित झाला मालिकेतून बाहेर
अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्मा याची नुकतीच कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. तो प्रथमच हे पद भूषवणार होता. मात्र, मुंबई येथे सरावादरम्यान त्याला दुखापत झाली व तो कसोटी मालिकेतून बाहेर झाला. त्याच्या जागी गुजरातचा अनुभवी सलामीवीर व दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय अ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाल याची संघात निवड केली गेली. मात्र, माजी भारतीय सलामीवीर व प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी या निवडीवर आक्षेप नोंदविला. त्यांनी हा बंगालचा सलामीवीर अभिमन्यू ईस्वरन (Abhimanyu Easwaran) याच्यावर अन्याय असल्याचे म्हटले.
काय म्हणाले आकाश चोप्रा
आकाश चोप्रा यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना प्रियांक पांचाल याच्याऐवजी अभिमन्यू ईस्वरन याची या दौऱ्यावर निवड व्हायला हवी होती, असे म्हटले. ते म्हणाले,
“अभिमन्यू हा इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत होता. त्याला पर्यायी सलामीवीर म्हणून संघात स्थान दिले गेलेले. मात्र, आता तो संघाचा भाग नाही. संघ निवडीबाबत काही स्पष्टता नाही. संघनिवडीत हे एक रोमांचक वळण आले. हा निर्णय हैराण करणारा आहे.”
अशी राहिली आहे प्रियांकची कारकीर्द
प्रियांकची आतापर्यंतची प्रथमश्रेणी आकडेवारी पाहिली तर, ती अत्यंत प्रभावी दिसून येते. प्रियांकने आपल्या बारा वर्षाच्या कारकिर्दीत १०० प्रथम श्रेणी सामने खेळताना ४५.५२ च्या शानदार सरासरीने ७,०११ धावा जोडल्या आहेत. यात प्रत्येकी २५ अर्धशतके व २४ शतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/ipl-is-reason-behind-controversy-in-indian-cricket/
पीसीबी ‘या’ प्रकारच्या खेळपट्टीवर खर्च करणार तब्बल ३७ कोटी रुपये? जाणून घ्या काय खास कारण