आकाश दीप याला शुक्रवारी (23 फेब्रुवारी) कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये शुक्रवारी सुरू झाला. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने आकाश दीप याला दिलेली पदार्पणाची संधी योग्य ठरली. पहिल्याच सत्रात आकाशने तीन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. भविष्यात आकाश भारताचा महत्वाचा गोलंदाज बनू शकतो. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खडतर प्रवास करावा लागला.
इंग्लंडविरुद्ध रांची कसोटी (Ranchi Test) सामन्यात आकाश दीप याला पदार्पणाची संधी मिळाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडची धावसंख्या 5 बाद 112 धावा होती. यातील तीन विकेट्स एकट्या आकाशने घेतल्या होत्या. अशात वेगवान गोलंदाजाचे कसोटी पदार्पण लक्षात राहण्यासारखे झाले. आकाशला पहिल्यापासूनच क्रिकेटची आवड होती. मात्र, पडिलांकडून यासाठी पाठिंबा नव्हता. वडिलांकडून आकाशच्या क्रिकेट खेळण्याला अनेकदा विरोध झाला. पण नावाप्रमाणेच त्याचे ध्येय देखील मोठे होते.
वडिलांचे मन राखण्यासाठी आकाशने नोकरी शोधण्याचे कारण देत घर सोडले आणि दुर्गापूरला गेला. त्याचे मुळ गाव बिरा जिल्यातील सासाराम हे आहे. दुर्गापूरला आल्यानंतर त्याने चुलत्यांच्या साथीने क्रिकेट खेळणे सुरू ठेवले. त्याने एका स्थानिक अकादमीत नाव नोंदवले. याठिकाणी आकाशच्या वेगवान गोलंदाजाला वाव मिळाला. पण यादरम्यानच ह्रदयविकाराच्या झटक्याने आकाशच्या वडिलांचे निधन झाले. दोन महिन्यांनंतर आकाशच्या मोठ्या भावानेही जगाचा निरोप घेतला. या दोन घटनांमुळे वेगवान गोलंदाजाची मानसिकता पूर्णपणे खालावली.
आकाशच्या घरची परिस्थिती नाजूक होती आणि एकट्या आईची काळजी देखील त्याला घ्यावी लागणार होती. याच कारणास्तव त्याला तीन वर्ष क्रिकेटपासून दूर रहावे लागले. त्याने नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता. पण क्रिकेटपासून दूर राहू शकणार नाही, हे त्याला लवकरच समजले. याच कारणास्त तो दुर्गापूरला परतला आणि शेवटी कोलकात्याची वाट धरली. कोलकाता गाठल्यानंतर आकाश एका छोट्या खोलीत राहू लागला. त्यानंतर क्रिकेटसोबत त्याचे नाते पुन्हा घट्ट होऊ लागले.
What an absolute beautiful speech by Rahul Dravid to Akash Deep on his Test debut.
– Rahul Dravid. ????????pic.twitter.com/Onv9wWrI4t
— Johns. (@CricCrazyJohns) February 23, 2024
सुरुवातीला त्याला बंगालच्या 23 वर्षांखालील संघात स्थान मिळाले होते. त्यानंतर लवकरच त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. डिसेंबर 2019 मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही पदार्पण केले. नंतर 2022 मध्ये त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजेच आरसीबीकडून 2022 आणि 2023 हंगामत आकाशने खेळला. पण या दोन हंगामात त्याला अवघ्या 7 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी दिली गेली. (Aakash Deep’s tough journey to debut for Team India)
रांची कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन
भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप (पदार्पण), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या –
INDvsENG । रांची कसोटीत इंग्लंड करणार प्रथम फलंदाजी, भारताकडून अजून एका खेळाडूचे कसोटी पदार्पण
SL vs AFG । वानिंदू हसरंगा विरुद्ध अंपायर; म्हणाला, ‘दुसरं काम शोधा…’






