बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या आमिर खान आपल्या नवीन स्टाईलसाठी ओळखला जातो. चित्रपटात नवीन नवीन भूमिका निभवण्यात आमिर खानला तोड नाही. आमिर खान प्रत्येक गोष्ट स्वत:च्या स्टाईलमध्ये करण्यासाठी ओळखला जातो. एकदा त्याच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही आमिर खान अशी कल्पना घेऊन आला, ज्याचा दूरदूरपर्यंत कोणही विचार करू शकला नाही. याच दरम्यान आमिर वेगळ्या प्रकारचा अवतार धारण करुन भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या घरी पोहोचला होता. या अवतारात आमीर खानला कोणीही त्याला ओळखू शकले नव्हते.
आमिर खानच्या या जुन्या आठवणीचा व्हिडिओ मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, आमिर खान आपली वेशभूषा बदलून रिक्षामध्ये बसून सौरव गांगुलीच्या घरी पोहोचला होता.
परंतु सौरव गांगुलीच्या घराबाहेर असलेल्या सेक्यूरिटी गार्डने वेशभूषा बदलून आलेल्या आमिर खानला घरात जाऊ दिले नाही. पण त्यानंतर गांगुलीला जसे समजले की तो आमिर खान आहे, त्यानंतर त्याने लगेच आमिर खानला घरात घेतले. त्यानंतर सौरव गांगुली आणि आमिर खान या दोघांनी रात्रीचे जेवण एकत्र केले. जशी लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली की आमीर खान गांगुलीच्या घरी आला, तशी गर्दी जमा होऊ लागली.
आमिर खानचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील अंदाज लावू शकता की, त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट का म्हणतात? व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर लोक खूप प्रतिक्रिया देत आहे.
काही दिवसांपूर्वीच आमिर आणि किरणने नुकताच घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केले आहे. आमिरच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘लालसिंग चड्डा’ या चित्रपटात दिसून येणार आहे. आमिर खान सोबत या चित्रपटामध्ये अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही दिवसांपूर्वीच आमिर खान आणि एली अवराम यांचे एक गाणेही प्रकाशित झाले आहे. यात दोघांची केमिस्ट्री खरोखरच अप्रतिम दिसून येत आहे.
सौरव गांगुलीची कारकिर्द –
दरम्यान बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने १९९२ ते २००८ या कालावधीत भारताकडून क्रिकेट खेळले आहे. दरम्यान त्याने ३११ वनडे सामने खेळले असून ११३६३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २२ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ११३ सामने खेळले असून ७२१२ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने एक द्विशतक आणि १६ शतके लगावली आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची २०१९ साली बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून निवड झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे! ‘दादा’चे तब्बल ३६ कोटी रुपये देत नाहीयेत ‘या’ दोन कंपन्या; कोर्टात घेतली धाव
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दिग्गज क्रिकेटर नवज्योत सिद्धू करणार पक्षांतर, ‘आप’शी मिळवणार हात?
बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत विंडीजची विजयाची हॅट्रिक, नायक पूरन-गेलने केले भन्नाट सेलिब्रेशन