पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्या ठिकाणी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला आहे. यामध्ये पाकिस्तान संघाचा पराभव झाला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार आमिर सोहेलने प्रशिक्षक मिसबाह उल हक आणि वकार युनिस यांच्यावर निशाणा साधला आहे.
पाकिस्तान संघाला दोन सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पत्करावा लागला. त्यामुळे आमिर सोहेलने या पराभवासाठी पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मिसबाह उल हक आणि वकार युनिस यांना जबाबदार धरले आहे. पराभवाबद्दल बोलताना म्हणाला प्रशिक्षकाचे काम हे फक्त खेळाडूनी चांगली कामगिरी केल्यावर टाळ्या वाजवणे आणि शाबासकी देणे नाही. उलट त्यांच्यातील कमतरता दूर करणे आहे.
संघातून काढले तर कारण द्या
सोहेल आपल्या ब्लॉग मध्ये लिहिताना म्हणाला, “नवीन खेळाडूंना काही सामन्यात खराब कामगिरी केली की काढून टाकण्यात येते. हे ही सांगितले जात नाही की, त्यांच्यामधे काय कमी आहे. त्यामधे कशी सुधारणा केली जाऊ शकते. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार्या मोहम्मद आमिरला संघातून का वगळण्यात आले होते याचे कारण सुद्धा सांगितले नव्हते. त्याच्यामधे असणाऱ्या कमतरता दूर करण्यासाठी काय केले? टाळी वाजवणे आणि शाबासकी देणे यासाठी प्रशिक्षकची गरज नाही. यासाठी तर माणसे ठेवली पाहिजेत. ते खेळाडू चांगले खेळले की टाळ्या वाजवतील आणि बोर्डाचा पैसा सुद्धा वाचेल.”
पीएसएलच्या आधारावर कसोटी संघ का निवडता?
याबद्दल बोलताना माजी खेळाडू म्हणाला, “आपली अडचण ही आहे की, आपण कसोटी संघ टी-20 च्या कामगिरीवर निवडतो. कसोटी मध्ये असे खेळाडू पाहिजेत, जे अनुभवी, तंत्राने चांगले आणि मानसिकतेने मजबूत आहेत. ते गरजेनुसार फलंदाजी करू शकतेल आणि धावपट्टीवर जास्त वेळ थांबू शकतील. मला विश्वास आहे की, मोहम्मद वसीम या सर्व गोष्टी लक्षात ठेवून संघ निवडतील.”
प्रशिक्षकाची निवड प्रक्रिया पारदर्शक करा
सोहेल म्हणाला,” मी मिसबाह उल हकला दोषी मानत नाही. परंतू त्याची चूक ही आहे की, तो नोकरीवर येऊन काम शिकत आहे. माझे मत आहे की प्रशिक्षक निवड प्रक्रिया पारदर्शक करण्याची गरज आहे. माजी खेळाडूंनी स्थानिक खेळाडूंना तयार करण्यासाठी नियुक्त केले पाहिजे. त्यांनी तिथे चांगली कामगिरी केली की, त्यांना पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करावी. त्यानंतरच त्यांना मुख्य पाकिस्तान संघाची जबाबदारी द्यावी.”
महत्वाच्या बातम्या:
– युनिव्हर्सल बॉस घेणार निवृत्ती? खुद्द गेलनेच दिले हे उत्तर
– खुशखबर! भारतातील क्रीडा सामन्यांना आता ५०% प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी
– भारतीय खेळाडूंनी दिल्या नववर्षाच्या हटके शुभेच्छा; पाहा काही खास ट्विट