---Advertisement---

ऑस्ट्रेलिया भूमीवरील ऐतिहासिक विजयानंतर आनंद महिंद्रा खुश! युवा पदार्पणवीरांना देणार ‘ही’ महागडी भेट

---Advertisement---

ब्रिस्बेनच्या द गॅबा मैदानावर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियन संघाला ३ विकेट्सने धूळ चारली. यासह भारतीय संघाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळविला. विशेष म्हणजे, युवा खेळाडूंचा भरणा असतानाही संघाने एवढे घवघवीत यश मिळवले.

त्यामुळे चोहोबाजूंनी भारतीय संघाचे कौतुक होत आहे. अशात महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी युवा भारतीय खेळाडूंना मोठे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरद्वारे त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मैदानात दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघावर आनंद महिंद्रा जाम खूश आहेत. भारताला अभूतपूर्व यश मिळवून देणाऱ्या संघातील सहा पदार्पणवीरांना त्यांनी महिंद्रा कार भेट देण्याचे ठरवले आहे. महत्त्वाचे म्हणजे, कंपनीच्या नव्हे तर स्वत:च्या पैशाने ते भारताच्या नवोदित खेळाडूंना आलिशान महिंद्रा कार बक्षीसाच्या रुपात देणार आहेत. यात मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, शुभमन गिल आणि नवदीप सैनी या युवा भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

https://twitter.com/anandmahindra/status/1352874126252273666?s=20

त्यामुळे ऑस्ट्रेलियात केलेल्या या दमदार कामगिरीचे युवा खेळाडूंना भरघोस बक्षीस मिळाल्याचे दिसते आहे. चहूकडून कौतुकाचा वर्षाव होत असताना भारतातील आघाडीचे उद्योजक असणाऱ्या आनंद महिंद्र यांच्याकडून मिळालेले हे बक्षीस या युवा खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावणारे असेल.

महत्वाच्या बातम्या:

अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा केला होता प्लॅन

पासा पलट गया! एकवेळ शास्त्रींना ट्रोल करणारे चाहतेच मागतायत त्यांची क्षमा, जाणून घ्या कारण

गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---