वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० विश्वचषकातील ३८ वा सामना शनिवारी (०७ नोव्हेंबर) खेळण्यात आला. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १५७ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया संघाने आठ गडी राखून सामना सहज खिशात घातला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने उत्तुंग षटकार मारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने सामन्यात १११ मीटर लांब षटकार मारला. या टी-२० विश्वचषकातील हा सर्वात लांब षटकार आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या चेंडूवर त्याने हा गगनचुंबी षटकार मारला. वेस्ट इंडिजच्या डावातील २० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रसेलने हा षटकार लगावला. १८ व्या षटकात फलंदाजीला आलेल्या रसेलला स्टार्कने एक शॉर्ट बॉल टाकला होता, ज्यावर त्याने डीप मिड-विकेटवर सुरेख पुल शॉट खेळला. हा दमदार फटका पाहून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच देखील थक्क झाला.
#WestIndies superstar #AndreRussell has smoked one of the biggest sixes of the tournament 🔥#T20WorldCup | #AUSvWI | #WI |
WATCH More 👉 https://t.co/7Lj4xsJ2Sv pic.twitter.com/hHoA5kMFd4
— Cricket Especial (@CricketEspecial) November 6, 2021
रसेलने २० व्या षटकात दोन षटकार ठोकले. त्याने वेस्ट इंडिजच्या डावातील शेवटच्या चेंडूवरही षटकार मारला. रसेलने वेस्ट इंडिजच्या डावाच्या शेवटच्या क्षणी ७ चेंडूत नाबाद १८ धावा केल्या. या खेळीदरम्यान रसेलने दोन षटकार आणि एक चौकार लगावला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ७ गडी गमावून १५७ धावा केल्या. संघाकडून कर्णधार कायरन पोलार्डने सर्वाधिक ४४ धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूडने चार विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजने दिलेले १५८ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १६.२ षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने नाबाद ८९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार लगावले. मिचेल मार्शने ५३ धावा केल्या. मॅक्सवेल शून्य धावा करून नाबाद परतला.
महत्त्वाच्या बातम्या-
-इंग्लंड संघाला मोठा धक्का! रिटायर्ड हर्ट होऊन धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय मैदानातून बाहेर
-वरिष्ठ खेळाडूंना आराम देऊन ‘या’ ५ खेळाडूंना द्यावी संधी; वीरेंद्र सेहवागने सांगितली नावे