येत्या २७ तारखेपासून आशिया चषक स्पर्धेची सुरुवात होणार आहे. यावर्षी भारत आणि पाकिस्तान संघ आशिया चषकातील त्यांच्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्धच्या सामन्याने करतील. हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ २८ ऑगस्ट रोजी आमने सामने येतील. मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता, ज्याचा बदला घेण्याच्या प्रयत्नात भारतीय संघ असेल. पाकिस्तानचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आकिब जावेद याने दोन्ही संघांमधील अंतराविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने तब्बल १० विकेट्स राखून भारताला पराभूत केले. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांताच पाकिस्तानने भारताला मात दिली होती. असे असले तरी, आगामी सामन्यात मात्र भारतीय संघ कमजोर दिसत नाही. मागच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकानंतर भारताने एकही टी-२० मालिका गमावली नाहीये. पाकिस्तानच्या १९९२ विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिलेले आकिब जावेद (Aaqib Javed) यांच्या मते भारतीय संघाचे पारडे काही बाबतीत पाकिस्तानपेक्षा जड आहे.
आकिबच्या मते भारताकडे हार्दिक पंड्या (Hardik Pandya ) सारखा अष्टपैलू खेळाडू आहे, जो महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. आकिब म्हणाला की, “दोन्ही संघांमधील अंतर हे त्यांची फलंदाजी आहे. भारताचे फलंदाज आजूनही अधिक अनुभवी आहेत. जर रोहित शर्मा सारखा फलंदाज खेळला, तर तो एकट्याच्या जोरावर भारताला सामना जिंकवून देऊ शकतो. हीच गोष्ट फखर जमान यालाही लागू होते. जर तो संयमाने खेळला, तर पाकिस्तान सामना जिंकू शकते. असे असले तरी, भारत आणि पाकिस्तान यांच्या मध्यक्रमात खूप अंतर आहे. सोबतच भारतचे अष्टपैलू आक्रमण जास्त मजबूत आहे, ज्यामुळे फरक पडतो. पाकिस्तानकडे हार्दिक पंड्यासारखा अष्टपैलू नाहीये.”
दरम्यान, हार्दिक पंड्या मागच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करत होता, पण त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. तसेच फिटनेसच्या कारणास्तव गोलंदाजी देखील करू शकत नव्हता. मधल्या मोठ्या काळाता तो भारतीय संघात खेळण्यासाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले होते आणि स्वतःच्या फिटनेसवर काम केले. आयपीएल २०२२ मध्ये त्याने जोरदार पुनरागमन केले आणि कर्णधाराच्या रूपात गुजरात टायटन्सला विजेतेपद पटकावून दिले. आयपीएलमधील प्रदर्शनानंतर हार्दिक भारताच्या ताफ्यात पुन्हा एकदा सामील झाला. आगामी आशिया चषकात तो देशासाठी खेळणार आहे आणि आगामी टी-२० विश्वचषकात देखील त्याला संधी मिळणे जवळपास निश्चित आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एका सुवर्ण युगाचा अंत! ‘बिग बुल’च्या निधनाने हळहळले भारतीय दिग्गज
मनातही तिरंगा आणि घरातही तिरंगा! मास्टर ब्लास्टरही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात सहभागी
झिम्बाब्वे दौरा जिंकण्यासाठी राहुलकडे आहेत ‘हे’ ३ हुकमी एक्के! कोणत्याही क्षणी निकाल बदलण्यात पटाईत