जगभरातील क्रिकेटप्रेमी सध्या आशिया चषक स्पर्धेची वाट पाहत आहेत. आगामी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांसमोर असतील. मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताला मात दिली होती. आता भारतीय संघ या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल. आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. पण या प्रमुख स्पर्धेत भारताचे काही खेळाडू असे आहेत, ज्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. आपण या लेखात अशाच २ खेळाडूंची माहिती घेणार आहोत.
१. रवी बिश्नोई –
भारताचा युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याला आशिया चषकासाठी निवडले गेले आहे, पण संघात आधीपासूनच काही उत्कृष्ठ फिरकी गोलंदाज आहेत. युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा सारखे दिग्गज आधीपासूनच संघात उपस्थित आहेत. एवढेच नाही अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन देखील संघात सहभागी आहे. अशात रवी बिश्नोईला संधी मिळण्याची शक्यता कुठेच दिसत नाहीये. असे असले तरी, त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध कामलिचे प्रदर्शन केले होते. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी त्याचे हे प्रदर्शन पुरेसे नाहीये.
२. आवेश खान –
आवेश खान (Aavesh Khan) यालाही आशिया चषकासाठी संघात निवडले गेले आहे. परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, याविषयी खूपच कमी शक्यता आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी संघात नसल्यामुळे त्याच्यासाठी संधी निर्माण होत आहे, पण वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत त्याने खूपच निराशाजनक प्रदर्शन केले होते. आशिया चषकात भारताकडे भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे दोन वेगवान गोलंदाज आहे, जे प्लेइंग इलेव्हनमध्ये गाजा पक्की करतील. तर अष्टपैलू हार्दिक पंड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका पार पाडू शकतो. अशात आवेश खानला संधी मिळण्याची शक्यता नाही, असेच दिसते.
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, अवेश खान, दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मनातही तिरंगा आणि घरातही तिरंगा! मास्टर ब्लास्टरही स्वातंत्र्याच्या अमृतमहोस्तवात सहभागी
वाढदिवस विशेष | एक अस्सल मुंबईकर, ज्याने प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवलं नाव
ऑस्ट्रेलियाच्या ऍलानाची ‘किंग’ कामगिरी, ‘द हंड्रेड’मध्ये हॅट्रिक घेत विश्वविक्रम केला नावावर






