---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या ऍलानाची ‘किंग’ कामगिरी, ‘द हंड्रेड’मध्ये हॅट्रिक घेत विश्वविक्रम केला नावावर

On: रविवार, ऑगस्ट 14, 2022 9:19 AM
Alana-King-Hattrick
---Advertisement---

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड महिला स्पर्धा २०२२ मध्ये शनिवारी (१३ ऑगस्ट) ऐतिहासिक कामगिरी घडली. ऑस्ट्रेलियाची फिरकी गोलंदाज ऍलाना किंग हिने या स्पर्धेत पदार्पण करत विकेट्सची हॅट्रिक घेतली आहे. मँचेस्टर ओरिजिनल्स विरुद्ध ट्रेंट रॉकेट्स या संघात झालेल्या सामन्यादरम्यान ऍलानाने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 

शनिवारी मँचेस्टरमध्ये मँचेस्टर ओरिजिनल्स आणि ट्रेंट रॉकेट्स (Manchester Originals Women vs Trent Rockets Women) हे संघ आमने सामने होते. या सामन्यातून ट्रेंट रॉकेट्स संघाकडून ऍलानाने (Alana King) ह हंड्रेड महिला (The Hundred) स्पर्धेत पदार्पण केले. या पदार्पणाच्या सामन्यातच तिने प्रभावी कामगिरी केली. २० चेंडू फेकताना केवळ १५ धावा खर्च करत तिने ४ विकेट्स घेतल्या. यात तिच्या हॅट्रिकचाही समावेश आहे.

मँचेस्टर ओरिजिनल्स संघाच्या डावातील ५३, ५४ आणि ५५ व्या चेंडूवर ऍलानाने हॅट्रिक घेतली. ५३ व्या चेंडूवर तिने कोरडेलिया ग्रिफिथ हिला त्रिफळाचीत केले. ती १२ धावांवर पव्हेलियनला परतली. पुढे नुकतीच फलंदाजीला आलेली सोफी एक्लेस्टोन हिला ऍलानाने शून्यावरच परत पाठवले. पुन्हा सलग तिसऱ्या चेंडूवर तिने कर्णधार केट क्रॉसला शून्य धावेवर आपली शिकार बनवले आणि विकेट्सची हॅट्रिक पूर्ण केली.

विशेष म्हणजे, तिने माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न यांनी बॉल ऑफ द सेंच्यूरी टाकलेल्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर ही विश्वविक्रमी कामगिरी केली आहे.

असा राहिला सामना
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना ट्रेंट रॉकेट्स संघाने १०० चेंडूत ५ विकेट्सच्या नुकसानावर ११९ धावा केल्या. ट्रेंट रॉकेट्सकडून यष्टीरक्षक ऍबीगेल फ्रिबॉर्न हिने सर्वाधिक धावा केल्या. ३८ चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांच्या मदतीने तिने सर्वाधिक नाबाद ४५ धावा केल्या. तर ३ फलंदाज एकेरी धावेवरच बाद झाल्या. या डावात डिएंड्रा डॉटिन हिने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात मँचेस्टर ओरिजिनल्सकडून एकाही फलंदाजाला साध्या २० धावाही करता आल्या नाहीत. सलामीवीर लिझेल लीने सर्वाधिक १७ धावा केल्या. अशाप्रकारे फक्त ८७ चेंडूतच मँचेस्टरचा संघ ७६ धावांवर सर्वबाद झाला आणि ट्रेंट रॉकेट्सने ४३ धावांनी सामना जिंकला.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

INDvsZIM | कर्णधाराबरोबरच प्रशिक्षकांचीही बदली, व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबर ‘हे’ २ दिग्गज पाहतील काम

…आणि त्या दिवशी १०० शतकांचा पाया रचला गेला

जेव्हा दिल्ली डेअरडेविल्सच्या संघमालकाने पूर्ण संघाला घडवलेली ताजमहालची सफर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---