---Advertisement---

“अविवाहित खेळाडूंपेक्षा विवाहित खेळाडूंचे बायो-बबलमध्ये राहणे जास्त अवघड”, ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे भाष्य

On: गुरूवार, जानेवारी 28, 2021 5:45 PM
---Advertisement---

कोरोना महामारीमुळे संपूर्ण क्रीडाविश्वावर अनेक बंधने लादली गेली आहेत. क्रिकेटदेखील यापासून निराळे राहिले नाही. सर्व प्रमुख स्पर्धा आणि मालिकांवेळी संघांना जैव प्रतिबंधक वातावरणात म्हणजेच बायो-बबलमध्ये राहणे अनिवार्य झाले आहे. मागील सात महिन्यांपासून खेळाडू सातत्याने बायो-बबलमध्ये राहत आहेत. मात्र आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार ऍरॉन फिंचने बायो-बबलच्या नियमांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. बायो-बबलमध्ये राहणे खेळाडूंसाठी कठीण जात असल्याचे त्याने म्हटले आहे.

विवाहित खेळाडूंसाठी अडचणीचा ठरत आहे बायो-बबल- फिंच

ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार असलेल्या फिंचने बायो-बबलविषयी म्हटले की, “ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंसाठी बायो-बबलमध्ये राहणे कठीण जात आहे. कोरोना महामारीमुळे खेळाडू या वातावरणाशी काहीसे एकरूप झाले आहेत. एकापेक्षा अधिक प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंसाठी या नियमांमध्ये काहीशी सूट देणे आवश्यक वाटते. अशीच परिस्थिती आणखी काही काळ राहिली तर, हे खेळाडूंसाठी योग्य ठरणार नाही.”

“इतका मोठा काळ कोणीही आपल्या कुटुंबापासून दूर राहू शकत नाही. संघातील सहा खेळाडू विवाहित आणि पालक आहेत. एका अविवाहित खेळाडूपेक्षा विवाहित खेळाडूंना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे वाटते,” असे फिंच पुढे बोलताना म्हणाला.

मॅक्सवेल, प्लेसीस यांनी केला होता बायो-बबलला विरोध

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज फाफ डू प्लेसिस याने पाकिस्तान विरुद्धच्या‌ कराची कसोटीआधी बायो-बबलविषयी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यांनेही बायो-बबलमध्ये राहणे कठीण जात असल्याचे म्हटले होते.

कोरोनानंतर पुन्हा क्रिकेट सुरू झाल्यावर सर्व संघांना विलगीकरणात राहणे बंधनकारक झाले आहे. विलगीकरण पूर्ण केल्यानंतरच खेळाडूंना सामन्यात खेळण्याची परवानगी मिळते. कोणत्याही खेळाडूने या नियमांचा भंग केला; तर त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. अशा प्रकारची पहिली कारवाई इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत केवळ ‘या’ दोन खेळाडूंनाच करता आली त्रिशतकी खेळी

टीम इंडियाच्या कामगिरीवर इंग्लंडचे माजी कोच फिदा, म्हणाले “भारताला मायदेशात हरवणे कठीण”

कमालीच्या फॉर्ममध्ये आहे ‘हा’ इंग्लंडचा खेळाडू; भारतीय संघासाठी ठरु शकतो सर्वात धोकादायक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---